कराड पोलीस उपविभागाकडुन कराड शहरात कोंबिंग ऑपरेशन
जुगार कायद्यान्वये 8 केसेस करीत रु. 75,675/- रोकडसह मुद्देमाल हस्तगत,

कराड पोलीस उपविभागाकडुन कराड शहरात कोंबिंग ऑपरेशन. जुगार कायद्यान्वये 8 केसेस करीत रु. 75,675/- रोकडसह मुद्देमाल हस्तगत, कोप्ताच्या 05, वाहतुकीस अडथळा करणा-या वाहनावर केसेस 05 गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई
कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत वाढलेली गुन्हेगारी कमी करणेसाठी पुढाकार घेत कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकुर सो तसेच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. के. एन. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कोंबिंग ऑपरेशन राबवित दिनांक 29.07.2024 रोजी अचानक सायंकाळी 07.30 ते 09.00 या वेळात कराड शहर पोलीस ठाणे, कराड शहर वाहतुक शाखा व कराड उपविभागीय अधिकारी कार्यालयातील असे 08 पोलीस अधिकारी व 25 पोलीस अंमलदार, RCP चे 1 पोलीस अधिकारी व 12 कर्मचारी यांचा फौजफाटा घेवुन कराड शहरामध्ये प्रामुख्याने कराड बसस्थानक परीसरामध्ये कांबिंग व नाकाबंदी ऑपरेशन करीत कराड शहरातील जुगार कायद्यान्वये 7, तसेच ऑनलाईन लॉटरी चालविणारांवर केस करीत रोख रु. 75,675/- सह मुद्देमालही जप्त केला आहे.
याशिवाय सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणे, तंबाखु, गुटखाजन्य पदार्थ खाणारांवर कोप्ता कायद्यान्वये 05 केसेस, सार्वजनिक वाहतुकीस अडथळा करणा-या वाहनावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिते नुसार केसेस केल्या. तसेच कराड शहर बसस्थानक परीसरामधील गुन्हेगारी मोडुन काढणेचा प्रयत्न केला यादरम्यान कराड पोलीसांचे अभिलेखावरील 10 माहीतगार गुन्हेगारांना चेक करीत त्यांच्या गुन्हेगारी हालचाली पडताळल्या. 05 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत परीसरातील विकास शिवाजी भंडारे, अक्षय दिपक सोळवंडे, शुभम सुनिल जाधव, मनोज महादेव जाधव, रोहीत महादेव जाधव, दिपक सोळवंडे, अजित युवराज भोसले, अमोल जगन्नाथ भोसले, अभिजीत संजय पाटोळे, बारक्या/ तुषार सुभाष थोरवडे यांना अचानकपणे चेक करुन त्यांच्या गुन्हेगारी हालचाली पडताळल्या. तडीपार गुन्हेगार चेक केले.
सदरची कामगिरी मा. समीर शेख सो, पोलीस अधीक्षक सातारा, मा. आंचल दलाल मॅडम, अपर पोलीसअधीक्षक सातारा, यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. अमोल ठाकुर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड, कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांचे समक्ष उपस्थितीत तसेच कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे सपोनि अमित बाबर व पोलीस अंमलदार कराड शहर पोलीस ठाणेचे सपोनि प्रशांत बधे, गणेश कड, पोउनि. कृष्णा डिसले, मारुती चव्हाण, राज पवार, भोसले व कराड वाहतुक शाखेचे सपोनि संदिप सुर्यवंशी, पोउनि. विजय भोईटे, व 10 पो. अंमलदार, कराड शहर पोलीस स्टेशनचे 25 पो. अंमलदार असे 08 पोलीस अधिकारी व 42 पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे. मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो, अप्पर पो. अधीक्षक आंचल दलाल मॅडम व श्री. अमोल ठाकुर, पो. उप अधिक्षक कराड यांनी पोलीसांचे अभिनंदन करीत यापुढेही अशा कारवायांमध्ये सातत्य ठेवण्यात येणार असलेचे कळविले आहे.