स्वातंत्र्यदिनीच कराडमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न
विविध सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आला आत्मदहनाचा प्रयत्न

स्वातंत्र्यदिनीच कराडमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न
विविध सामाजिक संघटनांचा आत्मदहनाचा प्रयत्न
वेळीच पोलिसांचा हस्तक्षेप , आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात , कराडच्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयासमोर घडला प्रकार !
याबाबत सविस्तर हकीकत अशी की गेली काही दिवस झाले स्वर्गीय अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा याकरिता विविध सामाजिक संघटनांच्या वतीने प्रशासनामार्फत पत्र व्यवहार व निवेदन देऊन सरकारकडे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशा आशयाची मागणी करण्यात आली होती तसेच काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा कराड दौरा असताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना देखील काही सामाजिक संघटनांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अण्णा भाऊ आपला सर्वांचेच होते त्यामुळे पुरस्कार हा मिळणारच अशी ग्वाही दिली होती परंतु अद्यापही कोणत्याही प्रकारचे उत्तर न मिळाल्याने आज 15 ऑगस्ट दिनी कराडच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे पुढील अनर्थ टळला, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
यावेळी स्वर्गीय अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे अशा आशयाच्या घोषणा देखील देण्यात आल्या !
एखादी व्यक्ती किंवा सामाजिक संघटना आत्मदहनाचा इशारा देते परंतु त्याच्या विषयाची गंभीर दखल घेतली जात नाही ही किती लाजिरवाणी गोष्ट असावी याची प्रचिती आजच्या कराडच्या आत्मदहनाच्या प्रकारावरून आपणास लक्षात येईल !
आजच्या या आंदोलनामध्ये मानव कल्याणकारी संघटना, जान फाउंडेशन,भीमशक्ती, भीम आर्मी,आदी संघटनेच्या वतीने सलीम पटेल, जावेद नायकवडी,आनंदराव लादे,संतोष थोरवडे,नितीन आवळे,लक्ष्मीताई काळे,कुसुमताई शेवाळे, अर्चनाताई जाधव, दिपाली पुस्तके, आदींचा सहभाग होता !
याबाबतचा व्हिडिओ पाहण्याकरिता 👇👇 येथे क्लिक करा