आंबेडकर वादी कार्यकर्ते संतप्त 

बहुजन समाज पार्टीच्या निवेदनाची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पार्किंग व्यवस्था केली का ?

आंबेडकर वादी कार्यकर्ते संतप्त

 बहुजन समाज पार्टीच्या निवेदनाची दखल घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पार्किंग व्यवस्था केली का ? 

आंबेडकर वादी कार्यकर्ते संतप्त 

कराड — नगरपरिषद हद्दीत गुरुवार व रविवार या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर व इतर ठिकाणी बाजार बसतो. हा बाजार उठवण्यासाठी व बाजार बसवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेला निवेदन देऊन आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्यात दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे बहुजन समाज पार्टी चे कराड शहर अध्यक्ष किरण थोरवडे यांनी दिनांक २७ सप्टेंबर रोजी मा. मुख्याधिकारी कराड यांना मागणी पत्र देऊन या परिसरामध्ये बाजार करण्यासाठी येणारे ग्राहक यांच्या टु व्हिलर व फोर व्हीलर गाड्यांना नगर परिषदेने पार्किंग सोय करून द्यावी अशी मागणी केली असताना आजचा बाजार दिवस असताना त्या निवेदनाची दखल घेऊन नगरपरिषदेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती पार्किंगची व्यवस्था केली काय. असा संतप्त सवाल आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विचारत आहेत. जर नगरपरिषदेला पार्किंगची व्यवस्था करता येत नसेल तर या परिसरातील बाजार अन्यत्र हलवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा नगरपरिषदेला येणाऱ्या काळात गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा बहुजन समाज पार्टी चे कराड शहर अध्यक्ष किरण थोरवडे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button