
उपजिल्हा रुग्णालय कराड येथील धक्कादायक प्रकार
उपजिल्हा रुग्णालय कराड येथील फार्मासिस्ट संतोष शेटे यांचे उद्धट वागणे
लसीकरणाचे इंजेक्शन उपलब्ध नाही असे सांगणे, अचानक व्हिडिओ चित्रीकरण केल्यानंतर लसीकरणाच्या इंजेक्शनचे अख्खे बॉक्स सिस्टर च्या टेबलवर येणे
याबाबत अधिक माहिती अशी की
उपजिल्हा रुग्णालय कराड
संतोष शेटे फर्मासिस्ट .07.09.2024 वेळ सायंकाळी 06.58 उपस्थित डॉक्टर धोंडीराम जाधव + एक सिस्टर व सायंकाळी 7.30 ला आलेले सिक्युरिटी गार्ड + कुत्रा चावलेले कडेगाव येथील लहान बाळ व त्याचे नातेवाईक + एक मद्य प्रशान करण्यामुळे अशक्त झालेले पेशंट
विषय :- कुत्रा चावल्या नंतर करण्यात येणाऱ्या औषधोपचारासाठी गेल्यानंतर चक्क लसीकरणाचे इंजेक्शन उपलब्ध नाही असे तेथे कार्यरत असलेल्या सिस्टर कडून सांगण्यात येते हा प्रकार उपस्थित डॉक्टर धोंडीराम जाधव यांनी पहिल्या नंतर डॉ. धोंडीराम जाधव यांनी फार्मासिस्ट संतोष शेटे यांना फोन करून माहिती विचारली असता त्यांनी पंधरा मिनिटात येतोय असे सांगितले त्यानंतर फार्मासिस्ट संतोष शेटे हे डॉ.धोंडीराम जाधव यांच्या केबिनमध्ये गेले तेथे त्या ठिकाणी त्यांनी फार्मासिस्ट संतोष शेटे यांना सांगितले की पत्रकार मंडळी आलेले आहेत तसेच कडेगाव येथून लहान बाळ आले आहे त्यांना ते इंजेक्शन लस द्यायचे आहे यावर फार्मासिस्ट संतोष शेटे यांनी डॉक्टरांना उद्धट भाषेमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करून कोण पत्रकार मी काय कोणत्या पत्रकारांना विचारत नाही असे उत्तर दिले त्यानंतर डॉ.धोंडीराम जाधव यांनी पुन्हा त्या फार्मासिस्ट संतोष शेटे यांना विनंती केली की महिला पत्रकार आहेत व एक लहान बाळाला पण लस द्यायची आहे तरीदेखील फार्मासिस्ट संतोष शेटे यांनी महिला असो अथवा कोणीही असो तुम्हीं ते मला सांगू नका आता मिळणार नाही म्हणजे नाही अशा भाषेत उत्तर दिले हा सर्व प्रकार पत्रकार शरीफ तांबोळी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करून फार्मासिस्ट संतोष शेटे यांना या प्रकारा बाबत विचारणा केली असता ते जे काही म्हणाले तो संपूर्ण प्रकार मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्यात आला आहे !
याच वेळेला येथून लहान बाळाला कुत्रे चावले असल्याने त्याचे नातेवाईक त्यास पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कराड या ठिकाणी घेऊन आले होते त्यांना देखील याच लसीकरणाची इंजेक्शनची गरज होती…… पुढे अचानकच धक्कादायक प्रकार समोर आला फार्मासिस्ट संतोष शेटे यांनी जे इंजेक्शन उपलब्ध नाही उद्या सकाळ शिवाय मिळणार नाही असे उद्धट भाषेत सांगितले होते त्याच इंजेक्शन चा संपूर्ण एक अख्खा बॉक्स सिस्टर च्या टेबल वरती अचानक आला याचे देखील व्हिडिओद्वारे मोबाईल मध्ये चित्रीकरण करण्यात आले आहे त्यानंतर उपस्थित महिला पत्रकार मुस्कान तांबोळी व कडेगाव येथील लहान बाळास लसीकरण केले लसीकरण करत असताना सिस्टरच्या मनात राग होता की काय.. काय माहिती इंजेक्शन मधील औषध शरीरामध्ये न जाता ते बाहेरच पडले पण सिस्टर म्हणाल्या झाले लसीकरण असो सिस्टर अनुभवी असाव्यात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लसीकरण झाले असावेत…परंतु शासनाने लाखो रुपये खर्च करून गोरगरिबांसाठी उपलब्ध केलेले हे उपजिल्हा रुग्णालय नेमके कशासाठी ? उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कामाचा जास्त ताण आहे का ? फार्मासिस्ट सुनील शेटे,कर्मचाऱ्यांकडून किंवा सिस्टर कडून ज्यादा काम करून घेतले तर जात नाही ना ? असे होत नसेल तर मग येणाऱ्या रुग्णा बरोबर असे का वागतात ? त्याची वरिष्ठांनी चौकशी केली पाहिजे.. अन्यथा हा सर्व प्रकार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेबांच्या,तसेच समंधित विभागातील आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे, कारण काय….
महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये लोकहिताच्या व जनसेवेच्या कामांना प्राधान्य दिले जात असून त्यासाठी कितीही निधी लागला तरी हे सरकार कमी पडू देत नाही, त्यामुळे अशा काही ठराविक कर्मचाऱ्यांच्यामुळे सरकारचे नाव बदनाम होता कामा नये याची देखील दक्षता घेणे तितकेच गरजेचे आहे !
माय मराठी टीव्ही च्या बातमीच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय येथे शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरु करत आहोत आम्हांस आशा आहे कि सर्व नागरिक देखील यास सहमती दर्शवतील व माय मराठी टीव्हीस पाठबळ देतील नक्कीच !
उद्याच्या बातमीपत्रात पहा या संपूर्ण प्रकारचा व्हिडीओ तसेच उपजिल्हा रुग्णालय कराड चे वैद्यकीय अधीक्षक या सर्व प्रकारा बाबत काय प्रतिक्रिया देतात !