खटाव तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी मायणीच्या प्रशांत कोळी यांची बिनविरोध निवड.
बिनविरोध निवड
खटाव तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी मायणीच्या प्रशांत कोळी यांची बिनविरोध निवड.
मायणी : माय मराठी टी.व्ही. प्रतिनिधी अमोल.रा.भिसे
याबाबत अधिक माहिती अशी की खटाव तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी मायणी ता. खटाव येथील प्रशांत कोळी यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रशांत कोळी यांची राज्य शासनाच्यावतीने सन २०१८ मध्ये पोलीस पाटील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.कोरोना काळातील त्यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय अशी होती. त्याचप्रमाणे मायणी सुरक्षा यंत्रणेत देखील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.या त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना यापूर्वी आदर्श सेवा पुरस्कार, उत्कृष्ट पोलीस पाटील आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
मायणीमध्ये होणारी विविध आंदोलने,उपोषणे, आत्मदहनाचे इशारे आदी कठीण प्रसंगी प्रशासन व नागरिक यांच्यात दुवा म्हणून त्यांनी केलेले काम वैशिष्ट्यपूर्ण असे आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रशांत कोळी म्हणाले,आपल्या अडीच वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये आपण पोलीस पाटलांना वेळेत न होणारे मानधन वेळेत मिळावे,तसेच त्यांना काम करीत असताना येत असणाऱ्या विविध अडचणींची सोडवणूक करणे,त्याचप्रमाणे प्रशासनातील नवनवीन बाबींची माहिती मिळवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण मिळवून देणे आदी कामांबरोबरच खटाव तालुक्यातील पोलीस पाटलांची एक खंबीर संघटना उभी करण्याच्या दृष्टीने आपण सर्वांना विचारात घेऊन प्रयत्न करू.
यावेळी निवडण्यात आलेली नवनियुक्त कार्यकारणी पुढीलप्रमाणे असल्याचे अध्यक्ष प्रशांत कोळी यांनी सांगितले-
खटाव तालुका पोलीस पाटील संघटना नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
प्रशांत कोळी मायणी(अध्यक्ष),अंजना माळवे,लक्ष्मीनगर,साधना चव्हाण ललगुण,
दिपाली भोसले कानकात्रे(उपाध्यक्ष)
प्रशांत पाटोळे अंबवडे (सचिव)
हणमंत बुधे,हणमंत सगरे,सुप्रीम मदने अमृत शिंदे (खजिनदार),ज्योती माने (संघटक)
सचिन शेटे कलेढोण,किशोर नागमल,सुधीर शिंदे (सल्लागार)अमृत शिंदे (कार्याध्यक्ष)