
शासकीय रेखाकला परीक्षेत संस्कार जाधवचे यश
मायणी : दि .१७ प्रतिनिधी अमोल.रा. भिसे
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई याच्यावतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला असून यामध्ये येथील मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ मायणीच्या भारतमाता विद्यालयातील इयत्ता नववी मधील विद्यार्थी संस्कार सयाजी जाधव याने ‘अ ‘श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवून त्याने एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत उज्वल यश संपादन केले.
त्याला चित्रकलेचे शिक्षक संतोष महामुनी व दुनेश सोनवलकर यांचे मार्गदर्शन मिळाले.त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे,सचिव सुधाकर कुबेर,सर्व संचालक,मार्केट कमिटीचे संचालक स्वप्निल घाडगे,सरपंच सौ.सोनाली रणजीत माने,उपसरपंच दादासाहेब कचरे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,सोसायटीचे चेअरमन अनिल माळी व सर्व संचालक,मुख्याध्यापक विजयकुमार पिसाळ,उपमुख्याध्यापक महेश तांबवेकर,पर्यवेक्षक बाळकृष्ण गुरव,ज्येष्ठ शिक्षक धोंडीराम थोरात, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.