स्व.सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालय कराड

स्व.सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
कराड :- याबाबत अधिक माहिती अशी की स्व.सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिला लाळे मॅडम यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला यावेळी कुष्ठरोग विभागाचे पर्यवेक्षक श्री. लोंढे यांनी ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार असून नागरिकांनी या अभियानाच्या अनुषंगाने त्वचेवर फिक्कट किंवा लालसर बधीर चट्टा,जाड व बधीर तेलकट चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, तळहात व तळपायावर मुंग्या येणे,अधिरता अथवा जखम असणे हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे,हाताची व पायांची बोटे वाकडी होणे, हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातून चप्पल निसटणे, त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे,डोळा पूर्णपणे बंद न करता येणे,भूवयाचे केस विरळ होणे अशा प्रकारच्या समस्या असल्यास अशा नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या कुष्ठरोग विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
या अभिवादन कार्यक्रमास कार्यालय अधीक्षक श्री. सुपेकर, मेट्रन सौ.मंगल जानकर, कुष्ठरोग विभागाचे अधिकारी श्री मंद्रूळकर,एन सी डी विभागाचे डॉ.पवार,दंत चिकित्सक डॉ.बडवे, डॉ.अभिजीत पाटील,विजय पट्टणशेट्टी, निलेश माने औषध निर्माण अधिकारी सौ. कुंभार मॅडम, तसेच उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.