कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातीलऑर्थोपेडिक डॉक्टरची व समोरील मेडिकल ची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी
उपजिल्हा रुग्णालयातील ऑर्थोपेडिक डॉक्टरचा यात समावेश तर नाही ना ?

कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील ऑर्थोपेडिक डॉक्टर व समोरील मेडिकल ची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी
कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की कराड शहरात प्रत्येक रुग्णालयाच्या आवारात मेडिकल स्टोअर्स आहेत आणि त्याच मेडिकल स्टोअर्स मधूनच औषधे घेऊन दाखवायला या. अशा पद्धतीने सर्रास शहरातील डॉक्टर हे पेशंटना सक्ती करत असल्याची चर्चा व धक्कादायक माहिती माय मराठी न्यूज चॅनलच्या प्रतिनिधी ला मिळाली असून, कराडच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर असणारे मेडिकल हे उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या पेशंटसाठी आर्थिक भुर्दंड बसवायला कारणीभूत नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे कारण काय ?, शासकीय रुग्णालयाने पुरविलेले साहित्य हे योग्य दर्जाचे नाहीत का ? गेली वर्षभरामध्ये रोज एखाद्या पेशंटचा हात पाय मोडला असेल तर त्यावर उपचार करावयाचा असेल तर उपजिल्हा रुग्णालय येथील डॉक्टर महाशय हे बाहेरून मेडिकल स्टोअर्स मधूनच मी सांगितले आहे तेच सामान घेऊन या असे सांगतात डॉक्टर महाशय एवढ्यावरच न थांबता समोर मेडिकल आहे तिथं जावा आणि मला फोन करायला सांगा मग मी त्याला सांगितो की त्या पेशंटला काय द्यायचे ते, माय मराठी टीव्ही च्या प्रतिनिधीच्या हाती लागलेल्या माहितीनुसार एका पेशंट चे बील हे साधारण हजार ते दीड हजार रुपये होतात. या रुग्णालयात येणारा रुग्ण हा व सर्वसामान्य कुटुंबातील असेल तर अशा रुग्णांनी काय करावे ? अशा पद्धतीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाजगी मेडीकल वाल्यांना हे डॉक्टर महाशय मॅनेज होत असतील तर यावर सार्वजनिक आरोग्य विभाग गप्प का ? यावर काय ठोस उपाययोजना करणार आहे की नाही ? हा प्रश्न सर्व सामान्य नागरिक विचारत आहेत !
तरी याबाबत माय मराठी टीव्ही चॅनल याचा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून नागरिकांना यापासून बाहेरच्या मेडिकल स्टोअर्स मधून आणावयास लावणारी यंत्रणा याचा येत्या काही दिवसांत पर्दाफाश करणार याची सविस्तर माहिती घेऊन अन्न व औषधी प्रशासन यांचेकडे याबाबत ची सविस्तर माहितीचा पाठपुरावा करणार !
( उपजिल्हा रुग्णालय कराड येथिल त्या डॉक्टर चे व मेडिकल वाल्याचे कॉल डिटेल्स ची तपासणी केल्यास दूध का दुध और पाणी का पाणी होण्यास वरिष्ठाना नक्कीच मदत होईल )