ग्रामीण भागातील रुग्णांना माफक दरात वैद्यकिय सुविधा देण्याचा प्रयत्न करणार : डॉ.एस.एन.पवार
मायणी

ग्रामीण भागातील रुग्णांना माफक दरात वैद्यकिय सुविधा देण्याचा प्रयत्न करणार : डॉ.एस.एन.पवार
मायणी : माय मराठी टी.व्ही. प्रतिनिधी अमोल.रा. भिसे
याबाबत अधिक माहिती अशी की ग्रामीण भागातील रुग्णांना गंभीर आजाराचे वेळी तातडीने मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते.अशावेळी ग्रामीण भागातील रुग्णांना योग्य वेळी व माफक दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावे व त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्याचा संकल्प मायणी येथे विश्वात्मा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड ड्रामा सेंटरची स्थापना सुमारे एक वर्षापूर्वी करुन केला.तो संकल्प प्रत्यक्षात साकार होत असलेले पाहून या सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर लोकांना समाधान होत असल्याचे प्रतिपादन विश्वात्मा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे कुटुंब प्रमुख व माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.सयाजीराव पवार यांनी केले.
विश्वात्मा हॉस्पिटलच्या, मायणीच्या एक वर्षपूर्ती निमित्ताने आयोजित आभार व सत्कार मेळाव्यात ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते.यावेळी हॉस्पिटलचे मेडिसिन तज्ञ डॉ.अस्लम शेख,सीईओ डॉ.दत्ता तांबवेकर.खटाव तालुका पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष प्रकाश सुरमुख, विद्यमान उपाध्यक्ष तानाजी चव्हाण,संघटक मारुती पवार,मायणी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जाधव ,पत्रकार महेश तांबवेकर ,अंकुश चव्हाण, अमोल भिसे,संदीप कुंभार, बाळासाहेब कांबळे,विशाल चव्हाण तसेच हॉस्पिटलचा सर्व स्टाफ उपस्थित होता.
डॉ.पवार पुढे म्हणाले, वैद्यकीय क्षेत्राच्या चांगल्या सुविधा व कामातून व उपलब्ध नवनवीन तंत्रज्ञान व साधन सामग्रीच्या माध्यमातून लोकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात वैद्यकीय क्षेत्रास चांगले यश मिळत आहे.
हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.दत्ता तांबवेकर म्हणाले, या हॉस्पिटलमध्ये अनेक गंभीर आजार झालेले रुग्ण दाखल होत असून त्यांच्यावर योग्य वेळी व अत्याधुनिक सुविधांमार्फत योग्य ते उपचार करण्याचा हॉस्पिटल मार्फत प्रयत्न केला जात आहे
यावेळी पत्रकार प्रकाश सुरमुख,अंकुश चव्हाण, बाळासाहेब कांबळे,डॉ. अस्लम शेख यांनी आपली मनोगते व्यक्त केली.याप्रसंगी अनफळे ता.खटाव येथील स्वप्निल यलमर या युवकास कोब्रा जातीच्या सापाने दंश केल्यानंतर त्यास या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येऊन त्याच्यावर तातडीने उपचार केल्यामुळे तो बरा झाल्याबद्दल त्याचा व त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉ.असलम शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अमोद चोथे यांनी केले व आभार पत्रकार महेश जाधव यांनी मानले. यावेळी हॉस्पिटलला नेहमी सहकार्य करणाऱ्या मायणीतील पत्रकारांचा हॉस्पिटलच्या वतीने शाल श्रीफळव पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.