निलेश गायवळ सोशल फौंडेशन यांचा वतीने कराड येथे मुलांना जेवणाचे टिफीन ,शालेय साहित्य वाटप
निलेश गायवळ सोशल फौंडेशन

निलेश गायवळ सोशल फौंडेशन यांचा वतीने मुलांना जेवणाचे टिफीन ,शालेय साहित्य वाटप
कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की सन्मानिय सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ हे नेहमी गोरगरिबांचा मदतीला दोन हात पुढे असतात. हॉस्पिटलमध्ये बिलाचा विषय असो, गावातील वाड्यातील बंद पडलेले रस्ते असो,लोकांतील मतभेद दूर करून एकत्र आणून मार्ग काढून त्यांना आपण सर्व एक परिवार आहे , मी तुमचा सुख दुःख तुमचा बरोबर आहे अशी संकल्पना घेऊन सामाजिक कार्यात नेहमी पुढे असणारे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व निलेशभाऊ गायवळ यांचा आदर्श समोर ठेऊन त्यांचा वाढदिवसानिमित्त निलेश गायवळ सोशल फौंडेशनचे पदाधिकारी म्हणून एक छोटासा प्रयत्नातुन उपक्रम राबवला आहे.
जिल्हा परिषद शाळा बाल सुधार गृह मलकापूर येथे आज दिनांक १७/०३/२०२५ रोजी गार्डन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश गायवळ यांचा वाढदिवसा निमित्ताने निलेश घायवळ सोशल फौंडेशन यांचा वतीने मुलांना जेवणाचे टिफीन ,शालेय साहित्य , वाटप करण्यात त्यावेळी अध्यक्ष सुवर्णाताई माने,
उपाध्यक्ष महेश भाऊ गायकवाड, सचिव संभाजी गायकवाड, खजिनदार मेहबूब शेख तसेच अनिस कच्ची, फिरोज मुजावर,आसिफ इनामदार, रमेश बिराजवार निखील पोपटाने तानाजी टिंगरे
शहाबुद्दीन शेख, इम्रान वाईकर, जुबेर शेख, शाळेचा मुख्यध्यपक सौ थोरात मॅडम तसेच सहशिक्षक साळुंखे मॅडम उपस्थित होत्या. मुख्याध्यपक थोरात मॅडमनी प्रास्तविक केले. मान्यवरांनी मुलांना मार्गदर्शन केले साळुंखे मॅडमनी मान्यवरांचे आभार मानले