एन.एम.एम. एस. व सारथी परीक्षेत भारतमाता विद्यालयाचे घवघवीत यश
प्रणव दगडे जिल्ह्यात प्रथम तर सुरज फडतरे जिल्ह्यात आठवा

एन.एम.एम. एस. व सारथी परीक्षेत भारतमाता विद्यालयाचे घवघवीत यश.
प्रणव दगडे जिल्ह्यात प्रथम तर सुरज फडतरे जिल्ह्यात आठवा
चार वर्षात मिळणार ३ लाख २६ हजार ४०० रुपयांची शिष्यवृत्ती
मायणी : माय मराठी टी.व्ही.प्रतिनिधी अमोल .रा.भिसे
याबाबत अधिक माहिती अशी की राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम. एम.एस.)योजनेअंतर्गत व
सारथी शिष्यवृत्ती २०२४- २५ साठी घेण्यात आलेल्या परीक्षेत मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या भारतमाता विद्यालय शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये भटक्या जमाती मधून प्रणव दगडे याने जिल्ह्यात प्रथम तर विमुक्त जातीमधून सुरज फडतरे याने जिल्ह्यात आठवा येण्याचा मान मिळवला आहे.या वर्षी तब्बल आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या आठ विद्यार्थ्यांना मिळून चार वर्षात ३ लाख २६ हजार ४०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
२०२४- २५ मध्ये घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी दगडे प्रणव दत्तात्रय व फडतरे सूरज राजाराम
सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी इळगेर विश्वराज सुरेश,जाधव अथर्व किरण,घाडगे शौर्य स्वप्निल,साळुंखे साहिल संदीप,शिंदे आर्यन अधिक,देशमुख आर्यन शरद या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक व विभागप्रमुख श्रीरंग फाळके, बाळकृष्ण गुरव,उदय गुरव,राहुल सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत प्रति वर्षी १२ हजार रुपये याप्रमाणे चार वर्षांत ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
तर सारथी शिष्यवृत्तीमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रति वर्ष ९६०० रुपये याप्रमाणे चार वर्षात ३८ हजार ४०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल व मार्गदर्शक शिक्षकांचे मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ मायणीचे चेअरमन.श्री.सुरेंद्रदादा गुदगे,संस्थेचे संस्थापक सचिव श्री.सुधाकर कुबेर , सर्व संचालक व भारतमाता विद्यालयचे मुख्याध्यापक विजयकुमार पिसाळ, उपमुख्याध्यापक महेश तांबवेकर,पर्यवेक्षक बाळकृष्ण गुरव,परीक्षा विभागप्रमुख धोंडीराम थोरात,महेश जाधव व सर्व शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी बंधू भगिनी,ग्रामस्थ,शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.