जागतिक आरोग्य दिनानिमित्त कराड च्या उपजिल्हा रुग्णालयाचा आरोग्य मंत्री यांच्या हस्ते सन्मान
आरोग्य मंत्री यांच्या हस्ते सन्मान

जागतिक आरोग्य दिनानिमित्त कराड च्या उपजिल्हा रुग्णालयाचा आरोग्य मंत्री यांच्या हस्ते सन्मान
कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. याचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत केलेल्या कामाची पोहच पावती म्हणून राज्यातून कराड च्या स्व.सौ.वेणूताई य.चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाची कामगिरी लक्षात घेऊन जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री मा. प्रकाशजी आबीटकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.सौ.सुनिला लाळे मॅडम, सहाय्यक अधिसेविका सौ. मंगल जानकर, भांडार प्रमुख श्री.विजय पट्टणशेट्टी, औषध निर्माण अधिकारी सौ.सविता कुंभार,ईसीजी विभागाच्या भोसले मॅडम व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री मा.ना. आबिटकर साहेब यांनी कराड च्या उपजिल्हा रुग्णालयाचे कौतुक करताना म्हणाले की, शंभर बेडचे रुग्णालय असुन त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कामाची व प्रसूती विभागाची यामध्ये नवजात बालक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया या सारख्या कामामध्ये कराडचे उपजिल्हा रुग्णालय अग्रेसर असून भविष्यात या रुग्णालयाचा विस्तार अधिक प्रमाणात करु असे आश्वासित केले. तसेच रुग्णालयीन कर्मचारी यांनी केलेल्या कामाची सुध्दा प्रशंसा केली.