कराडच्या उपजिल्हा रुग्णालयाला वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका
रुग्णालयात शिरले पाणी

कराडच्या उपजिल्हा रुग्णालयाला वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका
कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की कराड शहरात सायंकाळी पाचच्या सुमारास वीज वारा वादळी पावसासह गारांचा पाऊस सुरु झाला या पावसामुळे शहरातील विदयुत पुरवठा देखील खंडित झाला असून काही ठिकाणी झाडे पडली वाहनांचे मोठे नुकसान देखील झाले सामाजिक व राजकीय क्षेत्रातील काही मंडळींनी अशा परिस्थितीत आप आपल्या परीने सहकार्य करत काही ना काही कार्य हाती घेतले या वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने कराडचे उपजिल्हा रुग्णालय देखील वाचू शकले नाही रुग्णालयाच्या आवारात व रुग्णालयाच्या अंतर रुग्ण विभागापर्यत पाणी साचून राहिले होते. ते पाणी काढण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या सेविका आणि रुग्णाचे नातेवाईक यांनी पुरेपुर्ण प्रयत्न केला आहे परंतु अशा घटना या येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाला नवीन नाहीत. तरी या पुढे अवकाळी पावसामुळे परिस्तिथी बिघडली तर यास जबाबदार कोण उपजिल्हा रुग्णालय सर्व आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित राहणार का ?नेमके यासाठी काय उपाय योजना कराव्या लागतील ? आत्तापर्यंत उपाययोजना केल्या का नाहीत ? माय मराठी टिव्ही याचा पाठपुरावठा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.