
अण्णाभाऊ साठेंना ‘भारतरत्न ‘राज्याचा अस्मितेचा विषय!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा (प्रतिनीधी) याबाबत अधिक माहिती अशी की सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न ‘साठी मागणी योग्यच असून,अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न ‘हा राज्याच्या अस्मितेचा विषय असून यासाठीच्या ठरावासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून अखिल भारतीय साहित्य महामंडळ व ९९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन ,सातारा यांना पत्र व्यवहार करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी दलित महासंघाचे शिष्टमंडळास दिली.
सातारा येथे साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठीचा ठरावासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.शिष्टमंडळात राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे व जिल्हाध्यक्ष उमेश खंडूझोडे यांचा सहभाग होता.




