E-Paper

कराड तासगाव मार्गावर भीषण अपघात महिला जागीच ठार

भरधाव ट्रकने दिली दुचाकीला जोराची धडक

कराड तासगाव मार्गावर भीषण अपघात ट्रकचे दुचाकीला धडक महिला जागीच ठार 

अपघात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू 

कराड प्रतिनिधी — याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तासगाव मार्गावर आज सायंकाळी पाचच्या सुमारास पलुस येथून कराड कडे येणाऱ्या महिला कर्मचारी सविता प्रल्हाद बुचडे वय ४६ यांना बोबडे वस्ती कार्वे तालुका कराड येथे पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने सविता प्रल्हाद बुचडे वय ४६ यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक शफिक संदे रा. साखराळे तालुका वाळवा जिल्हा सांगली यास कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून पुढील कार्यवाही करण्याचे काम सुरू आहे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय कराड येथे आणण्यात आला असता या ठिकाणी एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे शवविच्छेदन साठी लागणाऱ्या वस्तू म्हणजेच कापड कापूस किंवा अन्य छोट्या मोठ्या वस्तू उपलब्ध नव्हत्या या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील चतुर श्रेणी कर्मचारी यांचे नातेवाईकांना फर्मान सदरच्या वस्तू असल्याशिवाय शवविच्छेदन करता येणार नाही त्यामुळे सदरच्या वस्तू आपण बाहेरून घेऊन या असे नातेवाईकांना सांगण्यात आले त्याप्रमाणे नातेवाईकांनी शवविच्छेदनासाठी लागणारे सर्व साहित्य बाहेरून आणून दिले 

तसेच हा जो प्रकार आहे तो आजचाच नाही तर प्रत्येक वेळेला हीच परिस्थिती दिसून येते तसेच शवविच्छेदन करताना लवकरात लवकर व्हावे याकरिता येथे उपलब्ध असलेले कर्मचारी मात्र नातेवाईकांना चिरीमिरीची मागणी करत असल्याचे बोलले जात आहे  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!