E-Paper
रथसप्तमीनिमित्त कराडमध्ये 111 सूर्यनमस्कार
हर्बललाईफ नूर्टेशन सेंटर व फिटनेस स्टुडिओ सेंटर यांच्या वतीने

रथसप्तमीनिमित्त कराडमध्ये 111 सूर्यनमस्कार
हर्बललाईफ नूर्टेशन सेंटर व फिटनेस स्टुडिओ सेंटर यांच्यावतीने कराडमध्ये छोटासा उपक्रम
कराड प्रतिनिधी :– याबाबत अधिक माहिती अशी की रथसप्तमी निमित्त कराड येथील प्रितीसंगम घाटावर येथे हर्बललाईफ नूर्टेशन सेंटर व फिटनेस स्टुडिओ सेंटर यांच्या वतीने १११ सुर्य नमस्कार घालण्यात आले.
सकाळी साडे सहा ते साडे आठ वाजेपर्यंत १११ सुर्य नमस्कार घालण्यात आले. सुर्य नमस्कार घालण्यासाठी आलेल्या सहभागी सदस्यांना कराड नगरपरिषदेचे नगरसेवक मा.विजय वाटेगावकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.
यावेळी सौ.जमिला मुलाणी, शितल शहा, कविता पवार, अशोक मोहने, सुहास रसाळ,मंगल साठे, किरण थोरवडे यांनी विशेष सहकार्य केले. शेवटी फिटनेस स्टुडिओचे संचालक व योग शिक्षक शंतनु कालेकर यांनी आभार मानले.





