E-Paper

निष्ठावंत कार्यकर्ते राष्ट्रवादी वर नाराज तर विद्यमान आमदारांकडून भाजपचे पाठबळ 

यळगाव जिल्हा परिषद गट.. निष्ठावंत कार्यकर्ते राष्ट्रवादी वर नाराज तर विद्यमान आमदारांकडून भाजपचे पाठबळ 

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये सलग 35 वर्ष विलासराव पाटील उंडाळकर काका यांनी आमदारकी भूषवली व काँग्रेसचे नाव जिवंत ठेवले तदनंतर भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व दाखवले कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर अतुलबाबा भोसले आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये अतुलबाबा भोसले यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व दाखवून दिले कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये अशी परिस्थिती असताना देखील गेल्या दशकाहून अधिक काळ राजाभाऊ पाटील उंडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी प्रामाणिक राहून कराड दक्षिण मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी काँग्रेसची एकनिष्ठ राहून देखील राजाभाऊ पाटील उंडाळकर यांना ऐन जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला नाही याचाच अर्थ निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाकडून दिलेले हे फळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून दिलेली वागणूक ही चर्चेचा विषय बनले असून कार्यकर्त्यांकडून देखील नाराजी व्यक्त केली जात आहे आम्ही इतके वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये जिवंत ठेवण्याचे काम करून देखील आमच्या नेत्याला ऐन जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये डावलण्यात आले व नव्याने नुकत्याच पाच सहा महिने झाले पक्षात प्रवेश केलेले व्यक्तीला तिकीट देण्यात आले हा आमच्यावर अन्याय नाही का ? अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली होती सदरची बाब भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांना कळाल्यानंतर अतुलबाबा भोसले यांनी क्षणाचा ही विलंब न करता राजाभाऊ पाटील उंडाळकर यांची भेट घेत येळगाव जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टी कडून राजाभाऊ उंडाळकर यांना पाठिंबा देत भाजप पुरस्कृत येळगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार घोषित करत एका निष्ठावंताला भले तो दुसऱ्या पार्टीचा का असेना न्याय देण्याचा प्रयत्न केला… यानंतर मात्र विविध चर्चांना उधाण आले कोणी म्हणाले की भाजपचे धक्का तंत्र… तर कोण म्हणतंय भाजपची खेळी.. पण हे भाजपचे धक्का तंत्र नसून भाजपची खेळी नसून एका निष्ठावंतावरती एका पार्टीने जो अन्याय केला अशा प्रकारचा अन्याय माझ्या मतदारसंघांमध्ये कोणावर होऊ नये अशी भावना मनामध्ये ठेवत राजाभाऊ पाटील उंडाळकर यांना यळगाव जिल्हा परिषद गटामधून भाजप पुरस्कृत उमेदवार जाहीर करत यळगाव जिल्हा परिषद गटातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागत यळगाव जिल्हा परिषद गटातून राजाभाऊ पाटील उंडाळकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केला असून कार्यकर्ते देखील जोमाने प्रचारास लागले असल्याचे दिसून येत आहे..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून यळगाव जिल्हा परिषद गटातून ऍड.उदयसिंह पाटील उंडाळकर देखील निवडणूक लढवत असून उदयसिंह पाटील उंडाळकर आणि राजाभाऊ पाटील उंडाळकर यांच्यामध्ये आता चुरशीचा सामना होणार असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे

संपूर्ण प्रकारानंतर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रतिक्रिया व राजाभाऊ पाटील उंडाळकर यांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा  

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!