E-Paper

चुकीच्या ठिकाणी उर्दू शाळा बांधण्यासाठी अनुभवी सामाजिक कार्यकर्त्याची खटपट ?

अनुभवी सामाजिक कार्यकर्त्यांना मुलांच्या आरोग्याचा विसर ?

चुकीच्या ठिकाणी उर्दू शाळा बांधण्यासाठी अनुभवी सामाजिक कार्यकर्त्याची खटपट ?

राजकारणासाठी सामाजिक कार्यकर्त्याचा वापर ?

अनुभवी सामाजिक कार्यकर्त्यांना मुलांच्या आरोग्याचा विसर ?

चुकीच्या ठिकाणी उर्दू शाळेची इमारत बांधली जाणार असल्याचे माहिती असून देखील नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर व नगराध्यक्षांवर सामाजिक कार्याच्या नावावर निवेदन देऊन एक प्रकारे नियमबाह्य काम करण्यास प्रवृत्त करण्याचा केविलवाना प्रकार का ? 

निवेदन देणाऱ्या अनुभवी सामाजिक कार्यकर्त्यांना शाळा कोणत्या ठिकाणी असावी याची नियमावली माहित नाही का ? 

अनुभवी सामाजिक कार्यकर्त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन मुख्याधिकाऱ्यांनी तसेच नगराध्यक्षांनी उर्दू शाळेच्या इमारतीचे काम सुरू केल्यास तसेच इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात त्या इमारतीमध्ये उर्दू शाळा सुरू केल्यास संभाव्य मुलांच्या आरोग्याची व सुरक्षेच्या दृष्टीने निर्माण होणाऱ्या प्रश्नाची जबाबदारी निवेदन देणारे अनुभवी सामाजिक कार्यकर्ते घेणार का ?

असा सवाल या ठिकाणी अनुभवी सामाजिक कार्यकर्त्याच्या निवेदनावरती उपस्थित झाला असून हे निवेदन त्यांनी स्वतःच्या मर्जीने दिले का त्यांना कोणी निवेदन देण्यास भाग पाडले ?हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत असून नेमकी सत्यता काय आहे हे त्या अनुभवी सामाजिक कार्यकर्त्यांनाच माहिती

परंतु अनेक स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविल्यानंतर व त्या ठिकाणी विरोध दर्शवण्या पाठीमागचे कारण दाखवून देऊन त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी करून देखील अचानकपणे अनुभवी सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना व नगराध्यक्षांना दिलेल्या या निवेदनाची उलट सुलट चर्चा आता स्थानिक नागरिकांमधून होऊ लागली आहे ,

त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी व नगराध्यक्षांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता निपक्षपातीने आपले कर्तव्य पार पाडावे तसेच नियमानुसार जर काही इमारत बांधण्यास येत असेल किंवा या इमारतीमध्ये भविष्यात उर्दू शाळा सुरू केल्यानंतर मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नसेल किंवा मुलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होणार नसेल तरच उर्दू शाळेच्या या इमारतीचे बांधकाम सुरू करावे

अशी चर्चा सध्या नागरिकांमधून जोर धरू लागली आहे तसेच  काही लोकांनी संविधान भवन बांधा परंतु या ठिकाणी उर्दू शाळेचे इमारत बांधू नका असे स्पष्ट संकेत मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत

तसेच मुख्याधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यास योग्य त्या कोर्टात जाऊन उर्दू शाळेची इमारत या ठिकाणी का बांधू नये यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे कोर्टामध्ये सादर करून स्टे आणण्याची प्रक्रिया करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे  !

 आपला विश्वासू

            कराडचा एक सुज्ञ नागरिक 

☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

अशी एक गोष्ट सध्या सोशल मीडियावर वायरल होऊ लागली आहे त्यामुळेआता मात्र पहावे लागेल की नगरपरिषदेचे जबाबदार अधिकारी म्हणून मुख्याधिकारी काय भूमिका घेतात व लोकनियुक्त नगराध्यक्ष या ठिकाणी मुलांच्या भविष्यातील आरोग्याच्या प्रश्नावरती किती गांभीर्याने निर्णय घेतात !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!