
चोरीला गेलेल्या चार दुचाकी हस्तगत
सातारा तालुका पोलीस ठाणे डी.बी पथकाची दमदार कामगिरी
सातारा प्रतिनिधी :- याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिकृत माहिती अशी की सातारा तालुका पोलीस ठाणे दिनांक 29/03/2026 रोजी फिर्यादी समीर असीफ मुलाणी रा. परळी ता.जि. सातारा यांनी परळी गावचे हददीतील त्यांचे राहते घराचे अंगणातुन हिरो कंपनीची स्पेंलडर क्रमांक एमएच 11 बीएम 0197 ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करुन घेऊन गेलेबाबतचा गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक साो, सातारा, निखिल पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले यांचे मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांनी सदर गुन्हयातील आरोपीस तात्काळ ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या होत्या
सदर चोरीस गेलेले वाहन एक इसम सातारा शहर हददीत फिरत असलेची गोपनिय माहिती प्राप्त झालेने सातारा तालुका पोलीस ठाणेचे डी. बी. पथकाने सदर एका संशयित इसमास मौजे कोडोली, सातारा ता.जि. सातारा येथुन दुचाकी व संशयित इसम नामे रेहान सिकंदर मुलाणी वय 20 वर्षे, रा. अमरलक्ष्मी चौक कोडोली सातारा यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसोशीने चौकशी केली असता चौकशी दरम्यान सदर इसमाने चार दुचाकी चोरी करुन घेऊन गेलेची कबुली दिल्याने सदर गुन्हयामधील इसमास ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर मिळुन आलेल्या दुचाकी पैकी सातारा तालुका पोलीस ठाणे चे एकुण 2 गुन्हे तसेच सातारा शहर पोलीस ठाणे चे एकुण 2 गुन्हे उघडकीस आणुन सदर आरोपीता कडुन एकुण चार दुचाकी मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोहवा संदिप कर्णे हे करित आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक साो, सातारा, निखिल पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले, सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक, श्री. अभिजीत गुरव, सहाय्यक फौजदार उमेश माने, पोलीस हवालदार संदिप कर्णे, दादा स्वामी, शिखरे, पंकज ढाणे, मनोज गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल संदिप पांडव, प्रल्हाद ढाकरे, पोलीस हवालदार संदिप आवळे, पोलीस कॉन्स्टेबल अभिजीतम मोरे, उमेश बगाडे, पाचांगणे, होमगार्ड विवेक शेडगे, सचिन सुतार यांनी केलेली आहे
सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री राजीव नवले, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे




