
कुठे नेऊन ठेवला माझा सह्याद्री साखर कारखाना ?
2026 बचाव मोहीम
ए-पब्लिक सब जानती है
कृष्णा कारखान्याचा आदर्श घ्यावा
आपला सभासदांचा मुलगा अमित डुबल करवडी
या नावाने सध्या सोशल मीडियामध्ये पोस्ट सह व्हिडिओ व्हायरल
सध्या कराड तालुक्यासह सह्याद्री साखर कारखाना कार्यक्षेत्रातील परिसरामध्ये एक पोस्ट मोठ्या प्रमाणात वायरल होत असून त्या पोस्टसोबत एक व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आलेला आहे जिकडेतिकडे सध्या याच व्हिडिओची आणि पोस्टची चर्चा होऊ लागली असून माय मराठी टीव्ही च्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की नेमकी ती पोस्ट काय आहे आणि नेमका तो व्हिडिओ काय आहे आणि काय आहे त्या लोकांच्या पोस्ट किंवा व्हिडिओ व्हायरल करण्या मागच्या भावना तसेच उपनिबंधक कार्यालय कराड यांना देखील संबंधिताने लेखी निवेदन दिलेले आहे ते देखील पाहूयात
👇👇👇👇👇👇👇👇 पोस्ट 👇👇
👉 सह्याद्री सहकारी साखर
कारखाना बचाव मोहीम 2026 कुठे नेऊन ठेवला माझा सह्याद्री सहकारी साखर कारखाना.
सभासद राजा जागा हो
लोकशाहीचा धागा हो कर्जबाजारी करून ठेवला सह्याद्री साखर कारखाना
निवडणुकीपूर्वी दिलेला आश्वासन पूर्ण केलेलं नाही. सापाच्या विळख्यातून कारखाना वाचवण्यासाठी देवाने सदबुद्धी द्यावी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीतून या कारखान्याची उभारणी झाली आहे.
कराड तालुका , पाटण तालुका, कडेगाव तालुका खटाव तालुका या कार्यक्षेत्रातील ऊस लोक गाळप करतात
सभासद संख्या भरपूर आहे सभासदांच्या माथ्यावर भुर्दंड कशासाठी मारला जातोय
मी सर्वसामान्य सभासदांचा मुलगा आहे दिवसभर आम्ही उन्हात काम करतो ऊसाला पाणी पाजतो तोंड बघून ऊस जातात कारखान्याला
अक्षरशा उसाची राख रांगोळी होतेय चालू वर्षी रसायनिक खताचे दर गगनाला भिडलेले आहेत त्यातच टनेजची साखर 5 वर्ष फुकट देणारी साखर आज तुम्ही 15 किलो प्रमाणे देताय
कृष्णा सहकारी साखर कारखाना गेली अकरा वर्षे झाले फुकट साखर देतोय आदर्श घेतला पाहिजे ते साखर कारखान्याचा
बाकीच्या कारखान्याच्या तुलनेत गाळप साडेआठ लाख झाल आहे क्षमता जास्त असताना सिस्टीमचा दोष आहे
सभासदांची दिवाळी कडू केली आहे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कर्मभूमीतला हा कारखाना आहे वसा आणि वारसा जपणारा कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे
काय अवस्था करून ठेवलेय
ए-पब्लिक सब जानती है
👉चेअरमन आणि संचालक मंडळ यांनी खुलासा करावा ही विनंती
आपला सभासदांचा मुलगा अमित डुबल करवडी
काय आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇
उपनिबंधक कराड यांना दिलेले निवेदन पहा 👇👇👇👇





