E-Paper

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवास स्वच्छता अभियान व नेत्र तपासणी पासून सुरुवात 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवास स्वच्छता अभियान व नेत्र तपासणी पासून सुरुवात 

कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त जयंती उत्सव कमेटीने ९ एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याची सुरुवात स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्वच्छता अभियान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करून करण्यात आली.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने ८ एप्रिल ते १४ एप्रिलपर्यंत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह आयोजित केला आहे त्या अनुषंगाने कराड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटी व कराड नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने स्व.सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या नेत्र विभागाच्या वतीने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान गुरुवार दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष नगरसेवक राहुल भोसले व कराड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मा. प्रताप उर्फ पोपटराव साळुंखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी कराड नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती सौ.अरुणा पाटील, बांधकाम समितीचे सभापती श्री. अख्तर आंबेकरी, विरोधी पक्षनेते श्री.विजय वाटेगावकर, नगरसेवक आशूतोष डुबल, नगरसेविका वैष्णवी वायदंडे,सौ.योगिता जगताप, सौ.वास्के,नगर अभियंता गिरमे साहेब, आरोग्य निरीक्षक श्री.काटकर साहेब, सुरेश पाटील, देवानंद जगताप, मुकादम प्रमोद कांबळे, अतुल माने,संजय लादे, अभिजीत खवळे, नारायण कांबळे, सुनिता आठवले, अनिता वाघमारे व इतर कर्मचारी व जयंती उत्सव कमेटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच दुपारी बारा वाजता उपजिल्हा रुग्णालय व जयंती उत्सव कमेटीच्या वतीने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते त्या शिबिराचे उद्घाटन. यांच्या हस्ते करण्यात आले.हे शिबीर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ सौ. सुनिला लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यालयीन अधीक्षक श्री.सुपेकर साहेब व सहाय्यक अधीक्षक श्री.आदेश कांबळे साहेब यांच्या सहकार्याने उपजिल्हा रुग्णालयाचे नेत्र चिकित्सा अधिकारी श्री.एन.जे चोपडे साहेब यांनी रुग्णांची डोळे तपासणी केली व मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

यावेळी जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष नगरसेवक राहुल भोसले यांनी श्री.चोपडे साहेब यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.या शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता.शेवटी जयंती उत्सव कमेटीचे सचिव संतोष बोलके यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!