E-Paper

साहेब जरा इकडे लक्ष द्या…

गल्लोगल्ली टवाळखोरी..ट्रिपल सीट गाड्या..कर्णकर्कश सायलेन्सर..भले मोठे हॉर्न..अन धूम स्टाईल

साहेब जरा इकडे लक्ष द्या…

गल्लोगल्ली टवाळखोरी..ट्रिपल सीट गाड्या..कर्णकर्कश सायलेन्सर..भले मोठे हॉर्न..अन धूम स्टाईल

साहेब नागरिक त्रस्त झालेत ओ

याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस प्रशासनाकडून विशेषता वाहतूक नियंत्रण शाखा व गुन्हे प्रकटीकरण शाखा तसेच क्राईम ब्रँच कडून सध्या शहरातील वाढीव हद्दीतील भागामध्ये पूर्वीसारखे कोंबिंग ऑपरेशन , नाकाबंदी , करणे गरजेचे आहे ,

कारण सध्या शहरातील वाढीव हद्दीतील भागामध्ये अनेक वेळेला अनेक ठिकाणी अल्पवयीन मुले गाडीवरून ट्रिपल सीट फिरताना आढळत असून नुसतेच ट्रिपल सीट नव्हे तर ज्या गाडीवरून हे फिरतात त्याला मॉडीफाय केलेला कर्णकर्कश सायलेन्सर , भले मोठे हॉर्न , मॉडीफाय केलेली नंबर प्लेट तर काही गाड्यांना नंबर प्लेटच नाही तसेच काही टवाळखोर मुले मुद्दाम चौका – चौकात टवाळखोरी करताना आढळून येऊ लागली आहेत ,

यांच्या या टवाळखोरीमुळे मुलींना – महिलांना अक्षरशः रस्त्यावर फिरणेच काय तर एखाद्या दुकानात जाणे देखील मुश्किल झाले आहे ,

गाडीवरून फिरत असताना जोरजोरात ओरडणे , रस्ता लहान आहे की मोठा , रस्त्यावरती कोण आहे की नाही हे न पाहता धूम स्टाईल ठोकणे , तसेच कोणी काही बोलल्यास एखाद्या फाळकूट दादाचं नाव सांगणे अथवा एखाद्या शहर सेवकाचे नाव सांगणे , धतींगपणा करणे , भाईगिरी करणे , रस्त्यावरच आडव्या-तिडव्या गाड्या लावून सिगारेट ओढणे , मावा खाऊन भर रस्त्यावर पिचकारी मारणे, रस्त्यावरच बर्थडे साजरा करणे ,

अशी सध्या वाढीव हद्दीतील भागामध्ये परिस्थिती दिसून येत असून , नागरिक मात्र भीतीपोटी व आपले नाव पुढे येईल या कारणास्तव तक्रार देण्यास टाळाटाळ करत आहेत ,

तसेच शहरातील वाढीव हद्दीतील भागामध्ये स्वतंत्र पोलीस चौकी असताना देखील अनेक वेळेला ही चौकी बंद अवस्थेत आढळून येते ,

तसेच नव्याने नेमणूक करण्यात आलेले या चौकीचे पोलीस अधिकारी अपवाद वगळता कोणाचा फोनच उचलत नाही ,

राहिला प्रश्न चौकीचा तर चौकीत जावे तर साहेब हजरच नसतात मग सुज्ञ नागरिकांना शहर पोलीस ठाण्यात जाण्याशिवाय पर्याय उरत नाही, आणि धावपळीच्या जीवनात शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्या करिता तितकासा वेळ नागरिकांना मिळत नाही ,

वास्तविक पाहता शहरातील वाढीव हद्दीतील भागामधली परिस्थिती चा विचार करता या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन नाकाबंदी तसेच साध्या वेशातील पोलिसांचा वावर असणे गरजेचे आहे ,

वाहतूक पोलिसांनी वाढीव हद्दीतील भागाकडे लक्ष देणे गरजेचे आहे फक्त शहरातील चौका चौकामध्ये उभे राहून वाहतूक नियंत्रण करणे आणि त्या ठिकाणीच कारवाया करणे इतकेच करून चालणार नाही वाढीव हद्दीतील भागात पण वाहतूक पोलिसांनी देखील लक्ष देणे गरजेचे आहे तसेच ,

या वाढीव हद्दीतील भागामधील पोलीस चौकीत दबंग पोलीस अधिकाऱ्यांची गरज आहे , त्यामुळे साहेब या सर्व प्रकाराकडे आपले लक्ष केंद्रित व्हावे या अनुषंगाने आम्ही ही माहिती सादर करीत आहोत ,

सदरच्या माहितीच्या आधारे लागणारे सर्व पुरावे देखील माय मराठी टीव्हीकडे उपलब्ध आहेत, तसेच माय मराठी टीव्ही कोणत्याही प्रकारचे वृत्त प्रसिद्ध करत असताना पुरावे असल्याशिवाय वृत्त प्रसिद्ध करत नाही ,

त्यामुळे साहेब तुम्ही लक्ष घाला नक्कीच शहरातील ग्रामीण हद्दीतील भागातील नागरिकांच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत की सदरच्या प्रकाराबाबत आपण लक्ष घालावे तसेच वाढीव हद्दीतील भागातील चौकीसाठी दबंग पोलीस अधिकारी नेमावेत तसेच वाढीव हद्दीतील भागातील पोलीस चौकी नेहमी नागरिकांसाठी खुली राहावी !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!