E-Paper

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कराड शहर वाहतूक शाखेकडून कारवाई

मॉडिफाईड सायलेंसर ब्लॅक फिल्म आले अंगलट

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कराड शहर वाहतूक शाखेकडून कारवाई

१४३ वाहनचालकांवर कारवाई करत १ लाख ४० हजार २५० रुपयांचा दंड वसूल

कराड प्रतिनिधी  :- दि. 24.07.26 याबाबत कराड शहर वाहतूक पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की कराड शहरातील विद्यानगर परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कराड शहर पोलिसांनी विशेष धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली असून

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील यांच्या आदेशानुसार व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात आली

महाविद्यालयीन परिसरात मॉडिफाईड सायलेन्सर लावून मोठ्या आवाजात बुलेट चालविणे, वाहनांवर बेकायदा ब्लॅक फिल्म लावणे तसेच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत होत्या. याची गंभीर दखल घेत वाहतूक नियंत्रण शाखेने अचानक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती

या मोहिमेत मॉडिफाईड सायलेन्सर लावलेल्या २८ बुलेट मोटारसायकलींवर कारवाई करून २८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच ब्लॅक फिल्म, आवश्यक कागदपत्रांचा अभाव, विनापरवाना वाहन चालविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन आदी विविध कारणांवरून एकूण १४३ वाहनचालकांवर कारवाई करत १ लाख ४० हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला

ही कारवाई कराड शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, देशमुख, हेड कॉन्स्टेबल पवार, गोसावी, टिकोळे, हेड कॉन्स्टेबल साळुंखे, पोलीस नाईक सावंत तसेच पोलीस कॉन्स्टेबल नारायणे व पाटील यांनी केली.

विद्यानगर परिसरात शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे मोठ्या संख्येने असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असून, मॉडिफाईड सायलेन्सर, ब्लॅक फिल्म आणि इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!