E-Paper

महिंद्रा थार गाडी खरेदी करण्याचे बहान्याने टेस्ट ड्राईव्ह साठी घेवुन जावुन फसवणूक करणा-या आरोपीतास अटक

एकूण 32,00,000/- रुपये किंमतीची 02 थार वाहने जप्त, 02 गुन्हे उघड

 

महिंद्रा थार गाडी खरेदी करण्याचे बहान्याने टेस्ट ड्राईव्ह साठी घेवुन जावुन फसवणूक करणा-या आरोपीतास अटक

एकूण 32,00,000/- रुपये किंमतीची 02 थार वाहने जप्त, 02 गुन्हे उघड

सातारा शहर डी.बी. पथक कारवाई 

सातारा प्रतिनिधी  :- याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दि.05/07/2026 रोजी सातारा शहर पोलीस ठाणे हददीमधुन महिंद्रा शोरुम मधुन एका अनोळखी इसमाने थार गाडी खरेदी करण्याचे बहान्याने थार गाडी टेस्ट ड्राईव्ह साठी घेवुन जावुन फसवणुक करुन वाहन पुन्हा परत न दिलेने अनोळखी इसमाविरुघ्द सातारा शहर पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असलेने गुन्हयामधील पाहिजे अनोळखी इसम व वाहनाचा शोध घेणेबाबत मा.पोलीस अधिक्षक साो, निखील पिंगळे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती मा. डॉ. वैशाली कडूकर, उपविभागिय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. विपुल पाटील, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सचिन म्हेत्रे, यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास आदेशीत केले होते.

सातारा शहर पोलीस ठाणेचे डीबी पथकाने गुन्हा दाखल झालेनंतर तात्काळ घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन आरोपी हा वाहन घेवुन पुणे दिशेन गेलेचे दिसुन आलेने गोपनिय माहिती, तांत्रिक विश्लेषन व कौशल्यपुर्ण तपास करुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन वाहन फसवणुक करुन घेवुन जाणारे अनोळखी इसमाचे नाव निष्पन्न केले. डीबी पथकाने उल्लेखनिय कामगीरी करत संशयित आरोपीत सोहेल अफजल बागवान वय 28 वर्षे, व्यवसाय- मजुरी, मुळ रा जुनी पेठ, पंढरपुर, सध्या रा जामखंडी पुल, बुधवार पेठ, जि सोलापुर यास सोलापुर शहर येथुन ताब्यात घेवुन गुन्हे तपासकामी अटक केले. अटकेदरम्याण आरोपीताने सातारा शहर तसेच चाकण पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड हददीमधुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक करुन 32,00,000/- रुपये किंमतीची 2 थार वाहने घेवुन गेल्याची कबुली देवुन वाहने काढुन दिलेने ती तपासकामी जप्त करण्यात आलेली आहेत. 

सातारा शहर पोलीस ठाणेकडुन नागरिक तसेच व्यावसायीक यांना आवाहन करण्यात येते कि, वाहन खरेदी विक्री करताना आवश्यक कागदपत्रांची खातरजमा करावी व कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची तात्काळ पोलीसांना माहिती दयावी.

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक साो निखील पिंगळे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती मा. डॉ. वैशाली कडूकर, उपविभागिय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. विपुल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सचिन म्हेत्रे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ.तुषार भोसले, सागर गायकवाड, वैभव माने,मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम, सुशांत कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, सचिन आदमाने, आशिकेष डोळस, तसेच सायबर पोलीस ठाणेचे स्टाफ यांनी केलेली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!