अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कराडमध्ये दाखल मात्र दोन दिवस अगोदरच मावा व गुटखा विक्रेत्यांचे शटर बंद
टीप दिली कोणी ?

अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कराडमध्ये दाखल मात्र दोन दिवस अगोदरच मावा व गुटखा विक्रेत्यांचे शटर बंद
टीप दिली कोणी ?
कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की माय मराठी टीव्ही द्वारे वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते की कराड शहरासह परिसरामध्ये अवैधरित्या बेकायदेशीरपणे मावा व गुटख्याची विक्री अगदी खुलेआमपणे सुरू आहे
माय मराठी टीव्ही ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले नाही तर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त पदी माननीय श्री तुकाराम मुंडे साहेबांची नियुक्ती झाल्यानंतर तुकाराम मुंडे साहेबांच्या सोशल मीडियाच्या हँडल वरती देखील सर्व काही हकीकत मांडली होती
त्यानंतर पोलीस प्रशासनाने एक वेळ काही मावा विक्रेत्यांवर पोक्ता अंतर्गत कारवाई केली होती , परंतु वृत्त प्रसिद्ध झाले कारवाई झाली की दुसऱ्या दिवशी पुन्हा खुलेआमपणे मावा गुटखा विक्री सुरू झाली ,
याबाबत देखील माय मराठी टीव्ही च्या माध्यमातून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते ,
आज मंगळवार दिनांक नऊ सहा 2026 रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सातारा कार्यालयाचे अधिकारी कराडला कारवाईसाठी दाखल झाले ,
याचा अर्थ असा की माय मराठी टीव्ही ने वेळोवेळी जे वृत्त प्रसिद्ध केले होते मावा व गुटखा विक्री ही बेकायदेशीर असून कायदेशीर याला मान्यता नाही तसेच शरीरासाठी हानिकारक देखील आहे म्हणजेच माय मराठी टीव्ही शहानिशा केल्याशिवाय व बातमीमध्ये सत्यता असल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे वृत्त प्रसिद्ध करत नाही
मंगळवार दिनांक नऊ सहा 2026 रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सातारा कार्यालयाचे अधिकारी कराडला कारवाया करण्यासाठी हजर झाले
परंतु अधिकारी कराडला दाखल होण्याअगोदरच गेली दोन दिवस झाले कोणीतरी टीप दिल्यासारखे व कारवाई होणार आहे याची माहिती दिल्यासारखे चित्र पहावयास मिळाले ,
कारण नेहमी कोणासही न जुमानता निर्भीडपणे अगदी बिनधास्त खुलेआम जे मावा व गुटखा विक्रेते आपला बेकायदेशीर व्यवसाय करत होते त्यांनी अचानकपणे आपल्या दुकानाचे शटर डाऊन केले , आणि चोरी चोरी चुपके चुपके मावा गुटखा विक्री सुरू ठेवली , चोरी चुपके सुरू असलेला प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास सहजासहजी येऊ शकत नाही , आणि कारवाई करायची म्हटले तर यांची दुकाने शटर डाऊन अवस्थेत
त्यामुळे आज अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना जो सुरू दिसला किंवा शटर डाऊन करून आत मध्ये बेकायदेशीर कृत्य करत असताना आढळून आला त्याच्यावर कारवाई नक्कीच होणार ,
आज कराड शहरामध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तर आलेच आहेत परंतु त्यांच्या हाती आज दिवसभरात काय काय लागते कोणा कोणा वरती कारवाई होते , याची सर्व माहिती माय मराठी टीव्हीच्या माध्यमातून आपणास नक्कीच देऊ !
माय मराठी टीव्ही च्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंती करू इच्छितो की आपण कराडला आलाच आहात तर , लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या व शरीरास घातक ठरणाऱ्या बनावट केमिकल युक्त ताडीविक्रेत्यांवरती देखील आपण कारवाई करावी त्यांचे नमुने तपासावेत तसेच कराड शहरांमध्ये बनावट व केमिकल ताडी नेमके कोण बनवत आहे याचा देखील छडा लावावा, व अन्न व औषध प्रशासनाच्या मार्फत गोरगरीब कुटुंबांचे उध्वस्त होणारे संसार वाचवण्यासाठी खारीचा वाटा म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाने सहकार्य करावे !




