E-Paper

शिवकालीन रस्ता वाचवण्यासाठी तीन गावांचा संघर्ष

शिवकालीन रस्ता वाचवण्यासाठी कोयना वसाहत जखिणवाडी नांदलापूर ग्रामस्थ एकवटले  

शिवकालीन रस्ता वाचवण्यासाठी तीन गावांचा संघर्ष  

शिवकालीन रस्ता वाचवण्यासाठी कोयना वसाहत जखिणवाडी नांदलापूर ग्रामस्थ एकवटले  

कराड प्रतिनिधी :- मौजे कोयना वसाहत ता. कराड जि. सातारा येथील कोयना वसाहत ग्रामपंचायत अंतर्गत उत्तर-दक्षिण जखिणवाडी रोड, घुणकी ते मातोश्री पतसंस्था ते डी-मार्ट ते म्हसोबा चौकापर्यत असलेल्या शिवकालीन रस्त्यावर लगतचे हिस्सेदार यांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत वारंवार कागदोपत्री पत्र व्यवहार करुन देखील अदयाप कोणतीही कारवाई न झालेमुळे मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय कराड येथे सोमवार दिनांक 08/06/2026 रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात आले 

श्री. काकासो ऊर्फ संजय शिवराम चव्हाण रा. कोयना वसाहत ता. कराड जि. सातारा व ग्रामस्थ कोयनावसाहत यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करुन मौजे कोयनावसाहत येथे ग्रामपंचायत अंतर्गत उत्तर-दक्षिण जखिणवाडी रोड, घुणकी ते मातोश्री पतसंस्था ते डी-मार्ट ते म्हसोबा चौकापर्यंत शिवकालीन रस्त्याची नोंद असलेला 1710 फूट व 33 फूट रूंदीचा कच्चा रस्ता आहे. 

या रस्त्यावरुन बहुसंख्य लोक ये-जा करत असून लगतच्या हिस्सेदारांनी अंगले 400 मीटर लांब व 13 फूट रुंदीचे अतिक्रमण केलेले आहे. 

त्यामुळे वहातुकीची कोंडी होत असून तेथील ग्रामस्थ व रहीवासी यांना नाहक त्रास होत आहे. 

याबाबत ग्रामपंचायत कोयनावसाहत यांचे मार्फतीने छ. शिवाजी महाराज अभियानांतर्गत पाणंद रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढणेबाबत प्रस्ताव अलाहीदा सादर करणेत आलेला आहे.

प्रश्नाधिन रस्ता हा प्रचंड वहातुकीचा असलेने वहातुकीची कोंडी झाल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वहातुकीच्या कारणावरुन किरकोळ वाद विवाद होत आहेत. 

याबाबत सर्व कागदोपत्री पुराव्यासह लेखी निवेदन दिलेले असून त्यावर अदयाप कोणत्याही प्रकरची कार्यवाही झाली अथवा नाही.

याबाबत कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे विषयांकीत मागणीबाबत न्याय मिळणेसाठी सोमवार दिनांक 08/06/2026 पासून मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय कराड येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!