भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते कराडमध्ये भव्य महाआरती
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ देशाच्या पंतप्रधानपदी राहण्याचा ऐतिहासिक विक्रम केल्याबद्दल महाआरती

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ देशाच्या पंतप्रधानपदी राहण्याचा ऐतिहासिक विक्रम केल्याबद्दल महाआरती
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते कराडमध्ये भव्य महाआरती
कराड प्रतिनिधी : – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ देशाच्या पंतप्रधानपदी राहण्याचा ऐतिहासिक विक्रम केल्याबद्दल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते कराडमध्ये भव्य महाआरती करण्यात आली. कार्वे नाका परिसरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही महाआरती उत्साहात संपन्न झाली.
यावेळी बोलताना आ.डॉ. भोसले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीसाठी, स्थैर्यासाठी आणि उन्नतीसाठी गेल्या १२ वर्षात महत्त्वपूर्ण पावले टाकण्याचे काम झाले आहे. दिल्लीतील राजपथला कर्तव्यपथ बनवण्याचे काम मोदीजींच्या माध्यमातून झाले. तसेच देशाची अंतर्गत सुरक्षा जपण्यासाठी त्यांनी संरक्षण दलाला मोठी ऊर्जा दिली आहे. देशाला आत्मनिर्धार करण्याचे काम मोदीजींच्या माध्यमातून झाले आहे.
यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, कराडचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, नगरसेवक सुहास जगताप, शिवाजी पवार, आशुतोष डुबल, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, भाजपाच्या शहराध्यक्ष सुषमा लोखंडे, स्मिता हुलवान, गिरीश शहा, रमेश मोहिते, उमेश शिंदे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कराड : श्री स्वामी समर्थ केंद्रात महाआरती करताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले 👇👇👇





