
रयत शिक्षण संस्थेच्या सातारा मध्य विभाग समन्वय सदस्यपदी अतुल कदम यांची निवड..
कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, आशिया खंडातील अग्रगण्य संस्थांपैकी भारतात असलेल्या व त्या संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली संस्था म्हणजेच सदगुरू गाडगे महाराज कालेज व इतर शैक्षणिक शाखा या संस्थेच्या सातारा मध्य विभाग समन्वय समिती सदस्यपदी श्री.अतुल कदम यांची निवड करण्यात आली.
दानशूर बंडा गोपाळा कदम यांचे नातू श्री. अतुल कदम हे कराड येथील सदगुरू गाडगे बाबा महाराज कालेजचे विकास समितीचे सदस्यही होते. रयत शिक्षण संस्थेच्या सातारा मध्य विभागाच्या समन्वय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.




