मावा व गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले
कराडमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाची मावा विक्रेत्यावर कारवाई

मावा व गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले
कराडमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाची मावा विक्रेत्यावर कारवाई
पोलिसात फिर्याद दाखल… एका मावा विक्रेत्यास अटक
माय मराठी टीव्हीच्या वृत्ताची अन्न व औषध प्रशासन विभागाने घेतली दखल
कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की माय मराठी टीव्ही च्या माध्यमातून कराड शहरासह परिसरात मावा व गुटखा विक्रेत्यांची सुरू असलेली परिस्थिती व यांचा खुलेआम सुरू असलेला गोरख धंदा याचे व्हिडिओ चित्रीकरणाद्वारे वस्तुस्थिती प्रसिद्ध केली होती
माय मराठी टीव्ही चे वृत्त प्रसिद्ध होताच पोलीस प्रशासनाने मावा विक्रेत्यांवर एक वेळ कारवाई देखील केली होती परंतु दोन दिवस उलटले की पुन्हा परिस्थिती जैसे थे आढळून आली हे मावा व गुटखा विक्रेते अगदी बिनधास्त आणि निर्भीडपणे थाटामाटात आपला व्यवसाय पुन्हा करू लागले
यावर देखील माय मराठी टीव्ही ने वस्तुस्थिती दाखवत वृत्त प्रसिद्ध केले तसेच माय मराठी टीव्ही च्या वृत्ताच्या अनुषंगाने कराड मधील भीमशक्ती सामाजिक संघटना व काही स्थानिक नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला लेखी तक्रारी केल्या त्या अनुषंगाने माय मराठी टीव्हीच्या वृत्ताचे दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभाग सातारा यांच्यावतीने अन्नसुरक्षा अधिकारी अन्न व प्रशासन विभाग श्री इम्रान हवालदार हे आपल्या साथीदारांसोबत कराडमध्ये दाखल झाले ,
एक तर मंगळवार कराड मधील मार्केट बंद असते तर दुसरीकडे कोणीतरी टीप दिल्यासारखे व अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कराडला येणार आहेत याची खात्रीलायक माहिती दिल्यासारखे अनेक मावा विक्रेत्यांनी गुटखा विक्रेत्यांनी आपापल्या दुकानाचे शटर बंद केले होते ,
मंगळवार दिनांक नऊ सहा 2026 रोजी अन्नसुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार यांनी कराड शहरामध्ये ठीक ठिकाणी पाहणी केली यावेळेस अनेक मावा विक्रेत्यांचे दुकाने बंद आढळून आले,
याचवेळी त्यांना खबर मिळाली की कराड शहरातील विजय दिवस चौकामधील साईबाबा मंदिराशेजारी एका वेल्डिंगच्या दुकानांमध्ये मावा बनवण्यासाठी लागणारे साहित्य त्यामध्ये सुगंधित तंबाखू व अन्य साहित्य घेऊन इसम नामे सैफ नजीर मुल्ला हा मावा बनवण्याच्या इराद्याने सदर ठिकाणी बसलेला आहे
त्या अनुषंगाने अन्नसुरक्षा अधिकारी इम्रान हवलदार यांनी सदर ठिकाणी छापा मारला असता सैफ नजीर मुल्ला वय वर्ष 32 राहणार गुरुवार पेठ कराड याने शासनाने जनहिताच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून काढलेल्या आदेशाचे अवहेलना करून शासनाने प्रतिबंधित अन्नपदार्थ हे आरोग्यास अपायकारक आहेत हे माहिती असून देखील विक्री करिता साठा केल्याने त्याच्यावरती कराड शहर पोलीस ठाणे येथे समक्ष जाऊन आरोपीत नामे सैफ नजीर मुल्ला वय वर्ष 32 राहणार गुरुवार पेठ कराड तालुका कराड जिल्हा सातारा याच्या विरोधात फिर्याद देत संबंधित विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला तसेच पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांनी इसम नामे सैफ मुल्ला यास अटक केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे
अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत मावा विक्रेत्यावर केलेल्या या कारवाईचा बोध इतर मावा व गुटखा विक्रेते घेणार का ? की दोन दिवस उलटल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थेट दिसणार ? याकडे आता संपूर्ण कराडकरांचे लक्ष वेधून राहिले आहे !
तसेच अन्न व सुरक्षा अधिकारी इम्रान हावलदार यांनी माय मराठी टीव्ही शी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या की मावा व गुटखा विक्रेत्यांवरती अशाच प्रकारच्या कारवाया इथून पुढे सुरूच ठेवणार असून कारवायांमध्ये सातत्य राहील तसेच माय मराठी टीव्ही द्वारे कराड शहरासह तालुक्यातील नागरिकांना त्यांनी आवाहन केले की फक्त मावा गुटखा सिगारेटच नव्हे तर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व बाबींबाबत जनतेने सतर्क रहावे व आपल्या परिसरामध्ये दुग्धजन्य पदार्थ असोत किंवा अन्य काही ज्यामध्ये भेसळ होत आहे असे आपणास आढळून आल्यास ताबडतोब अन्न व प्रशासन विभागाशी संपर्क साधावा !
तसेच माय मराठी टीव्ही देखील आवाहन करू इच्छिते की नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये जर काही अवैध गोष्टी घडत असतील तर कोणाचीही भीती व तमा न बाळगता निर्भीडपणे नजदीकच्या पोलिसांशी संपर्क साधावा अथवा माय मराठी टीव्हीला माहिती कळवावी आपण दिलेल्या माहिती बाबत गोपनीयता बाळगली जाईल तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यास मदत होईल !





