E-Paper

तब्बल 14 किलो 82 ग्राम गांजा जप्त 

Dysp कार्यालय व कराड शहर पोलिसांची कारवाई 

तब्बल 14 किलो 82 ग्राम गांजा जप्त 

Dysp कार्यालय व कराड शहर पोलिसांची कारवाई 

कराड प्रतिनिधी :- याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिकृत माहिती अशी की उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड व कराड शहर पोलीस ठाणे यांनी छापा कारवाई करुन अंमली पदार्थ कॅनाबीस (गांजा) केला जप्त

मौजे सैदापूर ता. कराड गावचे हददीतील सैदापूर कॅनाल परिसरात कारवाई करुन ३,९९,१७५/- रुपये किंमतीचा १४.०८२ कि. ग्रॅ. वजनाचे कॅनाबीस (गांजा) व साहित्य जप्त

मा. पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे सर, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती वैशाली कडुकर मॅडम यांनी सातारा जिल्हयामध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहिम अधिक प्रभावी कामगिरी करणेबाबत सुचना केले आहेत. 

त्यानुसार कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सुचना दिलेल्या आहेत.

दि. ०८/०६/२०२६ रोजी मा. राजश्री पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कराड विभाग कराड जि. सातारा यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, मौजे सैदापूर ता. कराड गावचे हददीत सैदापूर कॅनाल परिसरात एक इसम नामे गोरख जिजाबा पवार, रा. वडोली निळेश्वर ता. कराड सध्या रा. एस. जी. एम. कॉलेजचे पाठीमागे, साईहाईटस, प्रथमेश कॉलनी, विदयानगर सैदापूर ता. कराड हा गांजा विक्री करणेचे उददेशाने वाहतूक करीत आहे. 

मिळाले बातमीचे अनुषंगाने राजश्री पाटील यांचे आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अशोक भापकर यांचे अधिपत्याखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कराड व कराड शहर पोलीस ठाणेचे संयुक्त पथकाने छापा कारवाई करुन एकुण १,९९,१७५/- रुपये किंमतीचा ६.०८२ कि. ग्रॅ. वजनाचा कॅनाबीस (गांजा), सुझुकी अॅक्सेस मोटार सायकल व साहित्य ताब्यात घेवून जप्त करणेत आलेले आहे. 

सदर बाबत पोलीस हवालदार सागर बर्गे यांनी सरकार तर्फे कराड शहर पोलीस ठाणेस तक्रार दिली असून एक आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करणेत आला आहे. 

सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अशोक भापकर हे करीत आहेत. 

अटक आरोपीता कडून सदर पथकाने आणखी ०८ कि. ग्रॅ. वजनाचा व २,००,०००/-रुपये किंमतीचा गांजा पंचनामा करुन जप्त करणेत आलेला आहे. 

असा एकुण सदर गुन्हयात ३,९९,१७५/- रुपये किंमतीचा १४.०८२ कि. ग्रॅ. वजनाचा कॅनाबीस (गांजा), सुझुकी अॅक्सेस मोटार सायकल व साहित्य ताब्यात घेवून जप्त करणेत आले आहे. 

सदर आरोपीताकडे सदरचे पथक सखोल तपास करुन गांजा पुरवठा करणारे बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंकवर काम करत असून लवकरच सदर गुन्हयांत आणखी आरोपीत अटक होणेची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा.श्री. निखील पिंगळे सर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर मॅडम यांचे मार्गदर्शना खाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री संभाजीराव पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अशोक भापकर, पोलीस हवालदार असिफ जमादार, प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी, मयुर देशमुख, हर्षल साळुखे, महेश शिंदे व महेश पवार यांनी केलेली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!