
बेकायदा गांजा जवळ बाळगणारे इसमावर गुन्हा दाखल
खंडाळा पोलीस ठाण्याची धडाकेबाज कारवाई
सातारा प्रतिनिधी :- याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की खंडाळा पोलीस ठाणे हद्दित दिनांक २४.०७.२०२६ रोजी रात्री २०.०० वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक महेंद्र. जे. जगताप यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, जुना टोल नाका खंडाळा येथे एक इसम गांजा स्वतःचे जवळ बाळगून पांढरे रंगाचे चारचाकी गाडी मध्ये बसलेला असून सदरची गाडी मदिरा बिअर शॉपी जवळ थांबविलेली आहे.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी लागलीच तात्काळ पोलीस ठाणे कडील अंमलदार पाठवून शासकीय पंच, फोटोग्राफर यांना बोलावून घेवून सदर ठिकाणी जावून त्यास कारवाई बाबत माहीती देवून त्याची अल्ट्रॉज कार टोल नाक्या जवळील नवीन पुलाचे खाली घेवून त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव सचिन अनिल इंद्रेकर वय ४४ वर्षे व्यवसाय ड्रायव्हींग राहणार कांदळी ता जुन्नर जि पुणे असे सांगून त्यास गाडीतून खाली उतरवून त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात हिरव्या काळया रंगाचा उग्र वासाचा ओलसर गांजा एकूण वजन ८० ग्रॅम, तसेच रूपये २,६३,१००/- रोख रक्कम, रूपये ५,००,०००/- एक पांढरे रंगाची टाटा कंपनीची अल्ट्रॉज चारचाकी गाडी मिळून आली त्यावरून त्यास जागीच पंचनामा करून ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्यावरून खंडाळा १३६/२०२६ गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS) १९८५ चे कलम ८(c), २० (ब), (ii) (a) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला असून आरोपीतास गुन्हयाचे कामी अटक करण्यात आलेली आहे. आरोपीतास मा. हुजूर न्यायालयात हजर केले असता त्यास दिनांक २८.७.२०२६ रोजी पर्यत पोलीस अभिरक्षा मंजूर केलेली आहे.
सातारा जिल्हयात अवैद्य अन्न पदार्थावर कारवाई करणे बाबत मा.श्री. निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक साो सातारा, श्रीम. वैशाली कडुकर मा. अप्पर पोलीस अधीक्षक सोो सातारा, श्री. धन्यकुमार गोडसे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो फलटण भाग फलटण यांनी वेळोवेळी सुचना दिल्या होत्या त्या प्रमाणे त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र जे. जगताप , शरद तांबे पोलीस हवालदार , दत्ता दिघे पोलीस हवालदार , अमित चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल , धिरज नेवसे पोलीस कॉन्स्टेबल , हनुमंत गिते पोलीस कॉन्स्टेबल , श्रीकांत भोसले पोलीस कॉन्स्टेबल यांनी कारवाईत सहभाग घेवून आरोपीतास ताब्यात घेतले आहे.




