E-Paper

सह्याद्री साखर कारखाना परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी.. दोघे किरकोळ जखमी तर एक गंभीर..

बिबट्याचा हल्ला

सह्याद्री साखर कारखाना परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी.. दोघे किरकोळ जखमी तर एक गंभीर..

कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, शहापूर तालुका कराड येथे शनिवारी पिंपरी ( शहापूर ) येथील निखिल मारुती वांगडे वय वर्ष ३५ या युवकावर बिबट्याने हल्ला केला. त्या युवकाला कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून रविवारी सकाळी घरी सोडण्यात आले.

रविवार दिनांक २९ मार्च रोजी जयवंत बबन फसाले रा.शहापूर तालुका कराड या युवकावर दुपारच्या सुमारास हल्ला करून जखमी केले.तर साडे तीन च्या दरम्यान दुसऱ्या युवकाला त्याच परिसरात बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. सौरभ श्रीकांत कदम वय वर्ष २६ रा.शहापूर या दोन युवकांवर कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून यातील सौरभ कदम यास पुढील उपचारासाठी कूष्णा हास्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. वनविभागाच्या वतीने सह्याद्री साखर कारखाना परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. व जखमी युवकांची विचारपूस करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी उपजिल्हा रुग्णालय व कूष्णा हास्पिटल येथे गेले असल्याचीही माहिती मिळत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!