E-Paper

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कराड येथे वार्षिक सभेचे आयोजन — राहुल भोसले यांची माहिती

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कराड येथे वार्षिक सभेचे आयोजन — राहुल भोसले यांची माहिती 

कराड प्रतिनिधी — भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त सोमवार दिनांक ३० मार्च रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केल्याची माहिती जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक राहुल भोसले यांनी दिली. 

सालाबादप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कराड शहरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. सायंकाळी पाच वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, बुधवार पेठ कराड येथे या सभेचे आयोजन केले आहे. या सर्वसाधारण सभेत मागील वर्षाची कार्यकारी समिती बरखास्त करून नवीन कार्यकारी समितीची निवड केली जाणार आहे. तसेच मागील वर्षीचा वार्षिक जमाखर्चाचा अहवाल सादर केला जाणार असून त्यास मंजुरी घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तरी शहरातील व उपनगरातील सर्व आंबेडकर प्रमी , अनुयायी यांनी या वार्षिक सभेस उपस्थित रहावे असे आवाहन जयंती उत्सव कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!