E-Paper

परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने इ.१० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन —

संस्थापक आप्पासाहेब गायकवाड यांची माहिती 

परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने इ.१० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन — संस्थापक आप्पासाहेब गायकवाड यांची माहिती 

कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, कराड येथील परिवर्तन प्रतिष्ठान कराड या सामाजिक संस्थेच्या वतीने इ.१० परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा व त्यांना भावी शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवार दिनांक ३० मे रोजी कराड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सायंकाळी साडेसहा वाजता या सत्कार समारंभाचे आयोजन केले असल्याची माहिती परिवर्तन प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड यांनी दिली.

   इ. १० वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु.वरद सचिन पाटील, प्रचिती सतिश काटरे,आकूती प्रशांत कांबळे, तनिष्का अशोक लादे, श्रावणी भारत थोरवडे,शरयू शिरीष लादे, दिक्षा सचिन निकाळजे,रुणाल राहुल गडकर, रिद्धी दिपक काटरे, आश्लेषा सतिश कांबळे व इतरही विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान दिव्यांग कलाकारांचा भीम गितांचा कार्यक्रमही आयोजित केला असल्याची माहिती आयोजक दत्तात्रय दुपटे यांनी दिली. व तसेच या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!