E-Paper

कु. महोत्सवी किरण थोरवडे हिचा वाढदिवस काका काकीने केला अनोख्या पध्दतीने साजरा..

कराड

कु. महोत्सवी किरण थोरवडे हिचा वाढदिवस काका काकीने केला अनोख्या पध्दतीने साजरा..

कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, कराड येथील सामाजिक कार्यकर्ते व बहुजन समाज पार्टी चे माजी कराड शहर अध्यक्ष किरण थोरवडे यांची कन्या कु.महोत्सवी किरण थोरवडे हिचा वाढदिवस तिचे सख्खे चुलते व चुलती यांनी आपल्या घरात तिचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या काका काकीने ती उच्च शिक्षण घेत असलेल्या शैक्षणिक खर्च हा महागडा व शैक्षणिक साहित्य तिला या पैशातून घेता यावा भावनेतून तिला पंधरा हजार रुपयांचा धनादेश देऊन हा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या या निर्णयाचे वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मान्यवरांनी याचे कौतुक केले. व हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या घरातून सुरुवात केली पाहिजे अशी भावना ही व्यक्त केली. 

कु. महोत्सवी हि कोल्हापूर येथे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजच्या बीएससी च्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत आहे. हा शैक्षणिक उपक्रम चार वर्षाचा असुन तिने कशाचीही अपेक्षा न बाळगता आपलं शिक्षण पूर्ण करावी अशी अपेक्षा तिचे चुलते श्री.भिमराव थोरवडे व चुलती सौ.सिमा भिमराव थोरवडे यांनी व्यक्त केली. 

या वेळी तिचे वडील किरण थोरवडे व आई सौ.पूनम किरण थोरवडे तसेच परिवारातील सर्व नातेवाईक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!