E-Paper

कराड शहरासह परिसरातील अवैध मावा व गुटखा विक्रेत्यांना पाठबळ कोणाचे ?

खुलेआम बिनधास्त मावा विक्री / भावा रगड मावा / तुला कोणाची भीती

कराड शहरासह परिसरातील अवैध मावा व गुटखा विक्रेत्यांना पाठबळ कोणाचे ?

कराड प्रतिनिधी :- सध्या नागरिकांमधून उलट सुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे ती म्हणजे मावा व गुटखा विक्रेत्यांच्या बाबतीमध्ये कारण भर रस्त्यावरती नागरी वस्तीमध्ये चौका चौकामध्ये तसेच नगरपरिषदेच्या गाळ्यांमध्ये नगर परिषदेच्या नियमांना फाट्यावर बसवून सध्या मावा व गुटखा विक्रेत्यांनी आपले साम्राज्य पसरले असून यांच्या पाठीशी कोणीतरी एखादा लोकप्रतिनिधी अथवा पडद्याआड राहून पाठबळ देणारा नेता असण्याची दाट शक्यता आहे

कारण हे मावा व गुटखा विक्रेते कोणासही जुमानेना झालेत मग ते पोलीस प्रशासन असो किंवा प्रसिद्धी माध्यम असो हे मावा विक्रेते कोणासही जुमानत नाहीत यांचा अवैध गोरख धंदा अगदी खुलेआम पणे सुरूच आहे ,

ज्या ठिकाणी हे लोक मावा विक्री करतात त्या ठिकाणी यांचा हातचा मावा खाण्यासाठी मावा प्रेमी अगदी बिनधास्तपणे रस्त्यावरती आडव्या-तिडव्या गाड्या लावून माव्याचा पार्सल तयार होईपर्यंत तोंडात मावा भरून रस्त्यावरच पिचकारी मारत बसतात आणि एकमेकांना अगदी अश्लील पणे शिवीगाळ टवाळखोरी करत बसतात मग रस्त्यावरून आपल्या माता भगिनी ये जा करतात याचे देखील त्यांना भान उरत नाही ,

तसेच कार्वे नाका पाण्याच्या टाकी खाली नगरपरिषदेच्या गाळ्यांमध्ये सुरू असलेल्या मावा विक्रेत्यांबद्दल तर काही विचारूच नका या रस्त्याने शेकडो माता भगिनी ये जा करत असतात पण अक्षरशा त्या माता भगिनींना आपली मान खाली घालून जावे लागते

कारण या ठिकाणी सुरू असलेल्या मावा विक्रेत्यांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास भावा रगड मावा पुढे काय बी होऊ दे आम्हाला काय देणंघेणं नाही फक्त मावा विकायचा आणि पैसे कमवायचे

मग यांच्या दुकानासमोर आडव्या तिडव्या अस्ताव्यस्त  गाड्या त्याच गाड्यांवरती बसलेले टवाळखोर आणि रस्त्यावर मारत असलेल्या पिचकारी हे सर्व काही शहरातील नागरिक रोज आपल्या डोळ्याने पाहतात परंतु संबंधित विभागातील प्रशासनाला मात्र जाग येत नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल

कारण यांच्यावरती एकदा कारवाई करायची आणि त्यांना सोडून द्यायचे नंतर पूर्णपणे या अवैध व्यवसायिकांच्या वरती दुर्लक्ष करायचं आणि जर का कोणी विचारलेच तर यांचे उत्तर मात्र ठरल्यासारखे आम्ही कारवाया केलेल्या आहेत आणि आम्ही कारवाया करत असतो ,

मग यांच्या उत्तरावरती असा सवाल उपस्थित होतो की जर का एखादा व्यक्ती ट्रिपल सीट गाडी चालवत असेल तसेच गाडीचे कागदपत्रे नसतील नंबर प्लेट नसतील तर त्याला वाहतूक पोलिसांतर्फे दंडाचे आकारणी केली जाते आणि मग सोडले जाते परंतु तीच व्यक्ती दुसऱ्या दिवशी तेच कृत्य करत असेल तर त्याला केलेल्या कालच्या दंडावरती भागते का ? कालच्या केलेल्या दंडावरतीच त्याचे आजचे कृत्य माप केले जाते का ?

तसेच वारंवार जाणून बुजून केलेल्या कृत्यासाठी कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी असतील त्या तरतुदीचा पाठपुरावा होणार का ? पुन्हा आमच्या माता भगिनींना मान खालील करून जाण्याची वेळ येणार का ?

जर का मावा विक्रेत्यांचा व्यवसाय अवैध स्वरूपात मोडत असेल तर हे कुठेतरी थांबले पाहिजे ? आणि जर का वैध स्वरूपात यांचा व्यवसाय असेल तर यांना कुठेतरी नियमावली लावून दिली पाहिजे ,जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी करणार नाही, टवाळखोरी होणार नाही अश्लील भाषेत एकमेकांना शिवीगाळ होणार नाही , सार्वजनिक रस्त्यावरती मावा व गुटखा खाऊन पिचकारी मारणार नाही , अशा प्रकारची सक्ती करणे गरजेचे आहे !

शहरासह परिसरात ज्या ज्या ठिकाणी मावा व गुटखा विक्री होते त्या ठिकाणांपैकी काही ठिकाणी पुढील प्रमाणे कारवे नाका पाण्याच्या टाकीच्या खाली नगर परिषदेच्या गाळ्या मध्ये , साईबाबा मंदिर शेजारी विजय दिवस चौक , ईदगाह मैदान रस्त्याला नगरपरिषदेच्या रस्त्यावर टपरीमध्ये , ख्वाजा खिजर दर्गेच्या पाठीमागे नगरपरिषदेच्या गाळ्यामध्ये , कराड जनता बाजार च्या समोर , मोमीन मोहल्ला परिसर , दर्गा मोहल्ला परिसर , विद्येचे माहेरघर असलेल्या विद्यानगर कॉलेज परिसरात , ढेबेवाडी फाटा महामार्ग लगत , वारुंजी फाटा पाटण टिकटणे महामार्ग लगत  

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!