कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील दोन सराईत गुन्हेगारांना एक वर्षाकरीता सातारा जिल्ह्यातून हद्दपार
कराड

कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील दोन सराईत गुन्हेगारांना यास एक वर्षाकरीता सातारा जिल्ह्यातून हद्दपार
कराड प्रतिनिधी दि. 17.05.2026 :- याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिकृत माहिती अशी की कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार 1) शिवसागर ऊर्फ डोक्या संजय नलवडे वय – 30 वर्षे, रा. मलकापुर ता. कराड जि. सातारा 2) ऋषीकेश अविनाश सावंत वय 28 वर्षे, रा. 146 बुधवार पेठ कराड ता. कराड जि. सातारा यांचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक़ कारवाई करुनही ते प्रशासन व न्यायालयांचे आदेशाचे उल्लंघन करीत गुन्हे करुन शहरात दहशत माजवित असलेने त्याचेवर परिणामकारक प्रतिबंधक कारवाई व त्यांस त्याचे गुन्हे करण्याचे सवयीतुन परावृत्त करणेकरीता कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.डी. एम. दराडे व त्यांचे सहका-यांनी मा. पोलीस अधीक्षक सो सातारा मा. श्री. निखिल पिंगळे सो, अपर पोलीस अधीक्षक सातारा मा. श्रीमती डॉ. वैशाली कडुकर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय दंडाधिकारी सो कराड विभाग कराड अतुल म्हेत्रे यांचे आदेशान्वये दोन्ही सराईत गुन्हेगारांना 01 वर्षाकरीता सातारा जिल्ह्यातून हद्दपार करणेत आलेले आहे.
कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांचा अभिलेख पडताळणीचे काम चालु असुन अशा प्रकारे कोणी निष्पन्न झालेस यापुढील काळात त्यांचेवरही अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असलेचा इशारा वजा आवाहन वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. डी.एम. दराडे यांनी केले आहे. यापुढील काळातही अशा कारवायांमध्ये सातत्य ठेवणेत येणार असलेचेही कळविले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो सातारा मा. श्री. निखिल पिंगळे सो, अपर पोलीस अधीक्षक सातारा मा. श्रीमती वैशाली कडुकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड मा. श्रीमती राजश्री पाटील व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. डी. एम. दराडे, श्री. सहा. पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदुम व पोलीस अंमलदार पो.हवा 11 पाटील, पो.हवा. 1223 कुंभार , पो.ना 1728 जगताप, पो.ना. स्वामी 2204, पोलीस अंमलदार आनंदा जाधव, धीरज कोरडे, मोसीन मोमीन , मुकेश मोरे, अमोल देशमुख, निलेश विभुते, महिला पोलीस अंमलदार सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.




