कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील दोन गुन्हेगार एक वर्षाकारिता सातारा जिल्ह्यातून हद्दपार
कराड तालुका

कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील दोन गुन्हेगार एक वर्षाकारिता सातारा जिल्ह्यातून हद्दपार
कराड प्रतिनिधी दि. 18..05.2026 :- याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मा. पोलीस अधिक्षक श्री. निखील पिंगळे साो तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर सो, यांनी सातारा जिल्ह्यातील, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी साो., कराड विभाग, कराड यांनी पोलीस ठाणे अभिलेखावरील गुन्हेगार यांचेकडुन सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणेकामी अशा गुन्हेगारावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करणेबाबत आदेश पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते.
त्यानुसार कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील अभिलेखावरील १) तन्वीर अली पटेल, रा- वाघेरी, ता-कराड, जि-सातारा, २) सुनिल ताराचंद चव्हाण, रा-सुंदर नगर, उत्तर पार्ले, ता-कराड, जि-सातारा यांचे विरुध्द मा. पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र जगताप यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56(1) (अ) (ब) प्रमाणे मा. उपविभागीय दंडाधिकारी सो कराड उप विभाग, कराड यांना प्रस्ताव सादर केले होते. सदर प्रस्तावाचे त्यांनी अवलोकन करुन नमुद इसमांचे विरुध्द दिनांक 09/05/2026 रोजी सातारा जिल्हा हददीतुन १ वर्षाकरीता हददपार केल्याचे अंतिम आदेश निर्गमित केले आहेत.
तरी सदर इसमांना मा. उपविभागीय दंडाधिकारी सो कराड उप विभाग, कराड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे १ वर्ष कालावधी करीता सातारा जिल्हा हददीतुन हददपार करण्यात आलेले आहे. नमुद इसम हद्दीत मिळुन आलेस प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. निखील पिंगळे साो., मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर सो, तसेच, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी साो., कराड विभाग, कराड श्रीमती राजश्री पाटील साो., यांचे मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी मा. पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र जगताप साो यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री एस. आर. बिराजदार साो., तसेच त्यांचे पथकातील सहा. पोलीस उप निरीक्षक नितीन येळवे, पो.हे.कॉ. सचिन निकम, पो. ना. किरण बामणे, पो.कॉ. प्रफुल्ल गाडे यांनी केली आहे




