
शालेय विद्यार्थ्यांनी संस्काराला महत्त्व द्यावे : तानाजी चंदनशिवे
मायणी : माय मराठी टीव्ही प्रतिनिधी अमोल.रा.भिसे
याबाबत अधिक माहिती अशी की शालेय वयात झालेले संस्कार आयुष्यात आयुष्यभर लक्षात राहतात. शालेय विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक आहेत. समाजात वाढलेली दृष्ट प्रवृत्ती गुन्हेगारी ही व्यसनाधीनतेमुळे वाढत आहे.आपल्यावरील होत असलेले अन्याय कधीही सहन करू नका.तर इतरांवरही अन्याय करू नका.आईबाबा आणि गुरूजनांनी केलेल्या संस्काराला महत्व द्या.त्यांनी केलेले संस्कार कधीही विसरू नका.असे आवाहन वडूज निर्भया पथकाचे पोलिस अंमलदार तानाजी चंदनशिवे यांनी केले.ते मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ मायणीच्या वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेत निर्भया पथक वडूज ता.खटाव यांचे विद्यार्थीनींना स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.व्ही.ही. येवले मॅडम,पर्यवेक्षक सुभाष बागडे सर,पोलीस अंमलदार सागर पोळ, महिला पोलीस अंमलदार राजश्री खाडे मॅडम,कराटे प्रशिक्षक मास्टर विजय अवघडे,ब्लॅक बेल्ट धारक कु प्रेरणा गायकवाड,कु अपूर्वा माने,प्रशालेचे सर्व सहशिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.चंदनशिवे पुढे म्हणाले,शासनाने महिलांवर होणाऱ्या अन्यायासाठी निर्भया पथकाची निर्मिती केली.शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षिततेला महत्व दिले जाते.त्यासाठी 112 व 1091 हे टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत.खटाव माण तालुक्यात निर्भया पथकाने चांगली कामगिरी केली आहे.रोडरोमिओंनी निर्भया पथकाची चांगलीच धास्ती घेतल्याचे निर्भया पथकाच्या कामगीरीवरून दिसून येत आहे.दोन्ही तालुक्यात हे पथक विद्यार्थिनींना स्वयं संरक्षणाचे धडे तसेच समक्ष भेटून महिला व मुलींना सुरक्षेच्या अनुषंगाने वारंवार भेटी देत असते.विद्यार्थींनींनी न घाबरता संकट समयी टोल फ्री क्रमांकावर फोन करून तात्काळ मदत मागवण्याचे आवाहन त्यांनी केले.विद्यार्थींनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी कराटे प्रशिक्षक मास्टर विजय अवघडे सर व त्यांची टीम यांनी विद्यार्थीनींना कराटे प्रशिक्षणातील प्रात्यक्षिके करून दाखवली.कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.वर्षा येवले मॅडम म्हणाल्या,निर्भया पथकाने विद्यार्थ्यांना कायदेविषयक,छेडखानी कायद्याविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांच्यात जागृती करण्याचे काम केले.प्रशालेच्या विद्यार्थ्यांना केलेल्या सखोल मार्गदर्शनामुळे त्यांच्यात जागृती निर्माण झाली. त्यासाठी पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग श्री.रणजीत सावंत,वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक घनश्याम सोनवणे यांचे,यांच्यासह पोलीस विभागाचे शाळा प्रशासन आभार व्यक्त करीत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहिते सर यांनी केले.तर सूत्रसंचालन वाघमारे सर यांनी केले.सर्व उपस्थितांचे आभार सौ.भोसले मॅडम यांनी मानले.




