
मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त कराड येथे अभिवादन
कराड प्रतिनिधी :– याबाबत अधिक माहिती अशी की बहुजन समाज पार्टी चे संस्थापक अध्यक्ष मान्यवर कांशीरामजी यांची जयंती कराड येथे साजरी करण्यात आली बुधवार पेठ कराड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास बहुजन समाज पार्टी चे माजी कराड शहर अध्यक्ष किरण थोरवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
मान्यवर कांशीरामजी यांच्या प्रतिमेला भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष व्हि.आर.थोरवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बहुजन समाज पार्टी चे माजी सातारा जिल्हा अध्यक्ष पँथर अशोक भोसले, माजी जिल्हा उपाध्यक्ष सतीश रणशिंगारे, दत्तात्रय दुपटे, माजी जिल्हा सचिव विकास लोंढे, सुर्यकांत थोरवडे, विकास कांबळे यांच्यासह विविध मान्यवरांनी मान्यवर कांशीरामजी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.




