समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड यांना विधानपरिषदेवर संधी द्या बाल पँथर किरण थोरवडे यांची आप्पासाहेब गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मागणी
वाढदिवस विशेष

समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड यांना विधानपरिषदेवर संधी द्या बाल पँथर किरण थोरवडे यांची आप्पासाहेब गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मागणी
कराड प्रतिनिधी – दलित पँथर ते रिपब्लिकन पार्टी असा आंबेडकरी चळवळीतील व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले यांचे कट्टर समर्थक म्हणून साजरा जिल्हात ओळख असणारे समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शुभेच्छा देताना बाल पँथर किरण थोरवडे यांनी यांनी आप्पासाहेब गायकवाड यांना आठवले साहेब यांनी महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून काम करण्याची किंवा महामंडळावर काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक बुधवार पेठ कराड येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना श्री.किरण थोरवडे यांनी दलित पँथर पासून ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा सरचिटणीस पदावर कार्यरत असताना व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीच्या माध्यमातून समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड यांना राज्यपाल नियुक्त आमदार किंवा महामंडळावर काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली.
या वाढदिवसाच्या कार्यक्रमास आप्पासाहेब गायकवाड यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार आनंदराव पाटील, अशोकराव पाटील, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवणे, कराड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील, नगरसेवक राहुल भोसले, गणेश पवार, बांधकाम समितीचे सभापती अख्तर आंबेकरी, माजी नगरसेवक शांताराम थोरवडे, आनंदराव लादे, प्रभाकर थोरवडे, दत्तात्रय दुपटे, सुर्यकांत थोरवडे, किरण निकाळजे, कमल सावंत, यांच्यासह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रासह विविध मान्यवर उपस्थित होते. शेवटी आप्पासाहेब गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व आभार मानले.




