
विजय दिवस समारोह तर्फे आयोजित इफ्तार उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद
कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की विजय दिवस समारोह समिती व छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुप आणि सहयोगी संस्थांचे वतीने विशेष इफ्तार उपक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक 13 मार्च रोजी भादी काका सभागृह येथे उत्साहाने संपन्न झाले.
सध्या मुस्लिम धर्मीयांचा रमजान हा पवित्र महिना व रोजे सुरू आहेत. छ. शिवाजी उद्यान ग्रुपतर्फे यंदाची सहावी इफ्तार पार्टी (रोजा सोडण्याचा कार्यक्रम) आयोजित केलेला आहे.
सर्वधर्मसमभाव आणि जातीय सलोखा ही कराड शहराची सार्वत्रिक ओळख आहे. आपल्या कराड शहरांमध्ये राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करणे, वृद्धिंगत करणे व सर्व धर्मांमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करणे ही संकल्पना आणखी दृढ करण्यासाठी कराड येथील विविध संस्थांनी कर्नल संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील विजय दिवस समोरोहाचे वतीने करण्यात आले होते.
या आनंददायी एकात्मता सोहळ्यात बहुसंख्य मुस्लिम बांधवांसह सर्व जाती धर्मातील अनेक मान्यवर उस्फूर्तपणे उपस्थित होते याप्रसंगी हाजी मजहर कागदी, डॉक्टर शब्बीर काझी मा. अख्तरभाई अंबेकरी,मा. फारुख भाई पटवेकर मा. अल्ताफ भाई शिकलगार, इसाकभाई सवार कराड अर्बन बँक अध्यक्ष मा. समीर जोशी, मा. शशांक पालकर निसर्ग मित्र चंद्रकांत जाधव माननीय अल्ताफ भाई शिकलगार अशोकराव पाटील, माजी नगरअभियंता श्री मुल्ला साहेब, डॉक्टर सतीश घाडगे, सैफुल्ला मोमीन, माननीय डोळ साहेब आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी एडवोकेट संभाजीराव मोहिते मा. डॉक्टर सतीश घाडगे, सैफुल्ला मोमीन, फारुखभाई पटवेगर, अल्ताफ भाई शिकलगार अल्ताफ शेख मुल्ला डॉक्टर काझि आदींनी विशेष मार्गदर्शन केले.
या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी अभियंता ए.आर पवार मा. एम बी शिंदे सर, मा. चंद्रकांत जाधव, मा. मस्जिद आंबेकरी आदींनी विशेष परिश्रम घेतले. सर्व धर्म समभावाचा नेटका आदर्श घालून दिल्याबद्दल या उपक्रमाचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे.




