E-Paper

भीमशक्तीच्या निवेदनाची दखल

शाळा क्रमांक 10 ची घंटा पुन्हा वाजणार

भीमशक्तीच्या निवेदनाची दखल 

शाळा क्रमांक 10 ची घंटा पुन्हा वाजणार 

बालचमुनचा किलबिलाट पुन्हा ऐकायला मिळणार  

 

कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांनी दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री प्रशांत व्हटकर यांना निवेदन दिले होते की 

नगरपरिषद शाळा क्र.१० हि बौद्ध आणि मागासवर्गीय वस्तीतील शाळा आहे. 

मात्र सध्या या शाळेकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. या शाळेत फक्त २ विध्यार्थी नियमित शिक्षण घेतात. यासाठी शासन एका शिक्षकावर वर्षाकाठी १३ लाख रुपये खर्च करते. शाळेच्या पट संख्येबाबत अनेक वेळा आवाज उठवूनही जाणून बुजून मागासवर्गीयांची शाळा असल्याने दुर्लक्ष केले जाते 

कराड नगरपालीका शाळा क्र. ३ मध्ये विद्यार्थ्यांची रीघ लागली आहे. तेथे बसायला जागा नाही अश्या परिस्थितीत शाळा क्र. ३ चे काही वर्ग शाळा क्र.१० मध्ये बसवावेत. म्हणजे या ठिकाणी परत काही पालक आपल्या मुलांना या शाळेत दाखल करतील. कृपया जून २०२६ मध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी या शाळेत शाळा क्र.३ चे विध्यार्थी दाखल करावेत हि नम्र विनंती. याबाबत आपण सकारात्मक निर्णय न घेतल्यास संघटनेच्या वतीने पालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल यास पालिका प्रशासन जबाबदार राहील याची कृपया नोंद घ्यावी.

अशा आशयाचे निवेदन देण्यात आले होते वास्तविक पाहता शाळा क्रमांक 10 ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असून ज्या महामानवाने भारताचे संविधान लिहिले त्याच महामानवाच्या पुतळ्याच्या समोर असलेल्या शाळेबाबत पालिका प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे दिसून येत होते

परंतु भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष आनंदराव लादे यांनी दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या निवेदनाची दखल घेत कराड नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री राजेंद्रसिंह यादव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविताना आपल्या भाषणामध्ये नमूद केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील नगर परिषदेची शाळा क्रमांक 10 मध्ये शाळा क्रमांक तीन चे विद्यार्थ्यांचे बसवण्यात वर्ग बसवण्यात येतील तसेच ज्याप्रमाणे नगरपरिषद शाळा क्रमांक तीन ने नावलौकिक केले आहेत त्याप्रमाणे इथून पुढे नगर परिषद शाळा क्रमांक 10 देखील बनवण्याचा आमचा मानस आहे

त्या दृष्टीने गेल्या दोन दिवसांपूर्वी लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी नगर परिषद शाळा क्रमांक 10 ची पाहणी करून घेतली

भीमशक्तीच्या निवेदनाची दखल व लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी दाखवलेली कार्यतत्परता यामुळे आता नगरपरिषद शाळा क्रमांक दहाची घंटा पुन्हा वाजणार , बालचमुनचा किलबिलाट पुन्हा कानी ऐकू येणार , त्यामुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे ,

वास्तविक पाहता माय मराठी टीव्ही कोणावरही टीकाटिप्पणी करत नाही परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींनी ज्याप्रमाणे लक्ष केंद्रित करायला हवे होते त्याप्रमाणे लक्ष केंद्रित न केल्यामुळे आजवर नगर परिषद शाळा क्रमांक 10 ही वंचित राहिल्यासारखा प्रकार दिसून आला स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागाच्या विकासाबरोबरच प्रभागातील इतरही बाबींकडे तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे कारण जनतेने आपणाला चांगल्या विधायक कामासाठी निवडून दिलेले असते !

व्हिडीओ पाहण्यासाठी 👇👇👇 येथे क्लिक करा

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!