E-Paper

लोक न्यायालयात ऐतिहासिक तडजोड, एक कोटीचा अपघात विमा मंजूर

लोक न्यायालयाचे महत्व या घटनेने अधोरेखित केले.

लोक न्यायालयात ऐतिहासिक तडजोड, एक कोटीचा अपघात विमा मंजूर 

कराड प्रतिनिधी  :- याबाबत अधिक माहिती अशी की  कराड येथे घडलेल्या गंभीर मोटार वाहन अपघात प्रकरणात लोकन्यायालयाच्या माध्यमातून तसेच दोन्ही पक्षकारांच्या परस्पर सहकार्यातून तडजोड होऊन अपघातातील पीडित अर्जदार मोहन मारुती शेवाळे व कुटुंबीय यांना एकूण रुपये १ कोटी इतकी भरीव नुकसानभरपाई अदा करण्यात आली. लोकन्यायालयामध्ये दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्याने चर्चा होऊन सदर तडजोड यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. त्यावर लोक न्यायालयाने आपल्या हुकुमाची मोहोर उमटविली.

या मंजूर नुकसान भरपाई विमा रक्कमेमुळे पिडीत अर्जदाराला दिलासा मिळाला. न्यायालयात न्याय मिळतो याचा खरखुरा परिचय आज या निमित्ताने मिळाला अशी उत्स्फूर्त भावना पिडीत अर्जदाराने या प्रसंगी व्यक्त केली. एक कोटीचा अपघात विमा मंजूर झाला ही घटना कऱ्हाड लोक न्यायालयातील ऐतिहासिक घटना म्हणून गणली गेली आहे. याशिवाय लोक न्यायालयाचे महत्व या घटनेने अधोरेखित केले.

अपघातामुळे पीडित अर्जदार यांच्या कुटुंबास फार मोठे शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक स्वरूपाचे नुकसान सहन करावे लागले होते. या पार्श्वभूमीवर मा.न्यायालयाने या प्रकरणातील सर्व बाबींचा सखोल विचार करून, दोन्ही बाजूंच्या संमतीने नुकसानभरपाईची रक्कम निश्चित केली. त्यानुसार संबंधित विमा कंपनी / जबाबदार पक्षाने पीडित अर्जदारास रुपये १ कोटी इतकी रक्कम अदा केली.

याकामी मा. लोक न्यायालया मध्ये प्रभावी मध्यस्थी म्हणून जिल्हा न्यायाधीश यु. एल. जोशी व डी. बी पतंगे तसेच ज्येष्ठ विधिज्ञ ॲड एस. बी. गोवेकर यांनी काम पहिले. तसेच अर्जदार तर्फे ॲड. निरज फिरंगे, ॲड. अजिंक्य डुबल, ॲड. मच्छिन्द्र पवार, ॲड. यशवंतदत्त बेंद्रे, ॲड. ऋषिकेश यादव यांनी बाजू मांडली. विमा कंपनी मार्फत ॲड. एस. एस. फडतरे यांनी काम पहिले

या प्रकरणाचा निकाल हा मोटार अपघात दाव्यांबाबत लोकन्यायालय प्रभावी, वेगवान व न्याय्य पर्याय ठरू शकतो, याचे उत्तम उदाहरण मानले जात आहे. सदर तडजोडीच्या निर्णयाचे कायदेशीर व सामाजिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत असून भविष्यात अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये लोकन्यायालयाचा अधिकाधिक वापर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी संबंधित कुटुंबियांना हुंदका आवरला नाही. आपसूकच सर्वांच्या डोळ्यातून पाणी आले. यावेळी जिल्हा न्यायाधीश यु एल. जोशी यांनी स्वतःहून कुटुंबियांशी संवाद साधून धीर दिला. शिवाय यापुढील आयुष्य छान पद्धतीने जगा असा प्रेमाचा व धीराच सल्ला दिला. यनिमित्ताने जिल्हा न्यायाधीश यांच्यातील संवेदनशीलपणा दिसून आला.

पहा व्हिडीओ 👇👇👇👇

लोक न्यायालयात पिडीत अर्जदार यांना जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते धनादेश वितरण करण्यात आले. यावेळी समवेत न्यायाधीश व विधिज्ञ

👇👇👇👇👇👇👇👇👇

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!