E-Paper

पुढे ढकलण्यात आलेल्या प्रभागाच्या निवडणुका म्हणजे.. आधी हकीकत आधा फ.. सा.. ना.. ?

मतदार राजा जागा हो.... नाहीतर पाच वर्ष.. हाताची घडी... तोंडावर बोट

पुढे ढकलण्यात आलेल्या प्रभागाच्या निवडणुका म्हणजे.. आधी हकीकत आधा फ.. सा.. ना.. ?

मतदार राजा जागा हो…. नाहीतर पाच वर्ष.. हाताची घडी… तोंडावर बोट 

नुकत्याच काही प्रभागांमध्ये नगर परिषदेच्या अनुषंगाने निवडणुका पार पडल्या मतदार राजाने आपले मत मतपेटी द्वारे व्यक्त केले परंतु काही ठिकाणच्या प्रभागामध्ये हरकतीचा खेळ सुरू झाला तर अचानकच निवडणूक आयोगाने मतमोजणी देखील लांबणी वरती ढकलली हरकतीमध्ये स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली ती एखाद्या बोधकथेप्रमाणे असल्यासारखेच भासवते की काय ? निवडणूक आयोगाच्या घालू घातलेल्या नियमाच्या अनुसरून एखाद्या ठेकेदाराला निवडणूक लढविता येत नाही.. असे निवडणूक आयोगाकडून व निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून स्पष्ट झाले असेल असे आपण समजू… पण काही प्रभागातील मंडळी ठेकेदारी करण्यात अव्वल स्थानी असतात कोणतेही काम असो आपल्याशिवाय इतर कोणास जाता कामा नये यासाठी त्यांची ताकद पणाला लावलेली असते . वेळप्रसंगी साम-दाम दंड भेद याचा देखील वापर केला जात असल्याचे दबक्या बोलले जाते… परंतु होते काय न्यायदेवतेच्या डोळ्यावर नेहमी पट्टी असते ती ही काळी हे आपण नेहमीच पाहतो.. अशाच प्रकारे काही प्रभागातील मंडळी इतरांच्या नावे ठेकेदारी करत असतात.. इतरांच्या नावे ठेकेदारी करताना कशाप्रकारे सूत्र चालवतात हे त्यांचे त्यांनाच माहिती… त्यामुळेच कदाचित निवडणुका आल्या की अशा प्रकारच्या मंडळींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले की कानून के आखो पर कालीपट्टी ठरल्याप्रमाणे सर्व कागदे पुरावे वैध ठरणारच… कारण यात ही मंडळी शातीर दिमाग अन अव्वल चाल करणारी ठरतात….. प्रभागातील जनसेवक मात्र निवडणुका आल्या की विकास कामाच्या इतिहासाचे पुस्तक प्रत्येक मतदारांच्या समोर सादर करत असतात… परंतु प्रश्न असा पडतो की… या जनसेवकांनी स्वतःच्या खिशातील किती आर्थिक विकास केला…. विकास निधी देणारे शासन योजना राबवणारे प्रशासन काम करणारे ठेकेदार…. मग आम्ही विकास केला… या जोरावरती यांचा प्रचार जोमाने सुरू… मग पुढे काही मतदारांना गाजर दाखवण्याचे देखील काम या काळात केले जाते…. या सर्व गोष्टीचा मतदार राजाने बोध घेणे गरजेचे आहे… ही बोधकथा जरी काल्पनिक असली तरी… काही ठिकाणी हीच बोधकथा सत्य ठरू शकते… म्हणूनच मतदार राजा जागा हो आपल्या माय माऊली माता-भगिनींना… माय माऊली म्हणणाऱ्याच चारित्र्यसंपन्न अशा जनसेवकाला निवडा… कारण जशी आपण आपल्या माता भगिनींची सुरक्षा करतो काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्या जनसेवकाने देखील त्याच नजरेने आपल्या माता-भगिनींकडे पाहिले पाहिजे…. जिकडचे वारे तिकडे आम्ही.. असा आपस्वार्थ न बाळगता प्रभागातील मतदाराजाशी निष्ठावंत व प्रामाणिक राहून सदैव जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करणारा जनसेवक असावा….. 

( टीप :- सदर लेख हा कोणाच्याही भावना दुखावण्याकरिता नसून समाजामध्ये जे काही चांगले वाईट घडते त्याला अनुसरून एका बोधकथेद्वारे मांडण्यात आला असून यामुळे कोणाच्या भावना दुखवतील असा आमचा उद्दिष्ट मुळीच नाही याची कृपया नोंद घ्यावी )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!