
कराडच्या बुद्ध लेणीवर श्रावण पौर्णिमा साजरी.
कराड : बौद्ध युवा जागृती परिषद,कराड व भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर शाखा यांच्या वतीने कराडच्या बुद्ध लेणी वर श्रावण पौर्णिमा मोठया उत्साहात संपन्न झाली.
यावेळी कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातून ३०० लेणी संवर्धक व उपासक उपस्थित होते.भन्ते सिरिसारो यांनी पंचशील देऊन लेणी संवर्धक कैलास कांबळे व रोहित वाघमारे यांनी लेणीची व लेणी बचाव आंदोलनाची माहिती दिली.
कोल्हापूरच्या बौध्द महासभेच्या २२ प्रतिज्ञा अभियान व तेजस कांबळे आणि सहकारी यांनी या अभ्यासदौऱ्याचे नियोजन करत लोकांना संबोधित केले.
कराडच्या बुद्ध लेण्यांच्या समूहात ५ गट असून जवळजवळ १०८ बुद्ध लेण्यांचा यात समावेश आहे. जखीनवाडीच्या लेणीवर ऐकून २६ लेणीसमूह असून ४ चैत्यगृह, ४ चैत्यविहारे, १८ ध्यानकक्ष, बसण्यासाठीचे बाक, सभामंडप, व्हरांडा, लेणी क्र. ६ मध्ये गजपृष्ठाकार चैत्यगृह, चैत्यस्तूप, धम्मचक्र, सिंहस्तंभ,आमलक शिल्प अष्टकोनी पिल्लर पाहता येतात तसेच बऱ्याच ठिकाणी पाण्याची पोडी (टाके) व बसण्यासाठीचे बाक पाहायला मिळतात.आगाशीवच्या लेणी क्र. ४० मध्ये शिलालेख आढळून येतो.तसेच सातारा जिल्ह्यात असणारा वाई तालुक्यात रेणुसेवस्ती बुद्ध लेणी, कांबटवाडी बुद्ध लेणी, लोहारे बुद्ध लेणी,पांडवगड बुद्ध लेणी, मेनवली बुद्ध लेणी,सोनजाई डोंगर बुद्ध लेणी, बावधन बुद्ध लेणी,केंजळ लेणी,शिरगांव खांबटाके लेणी, रायरेश्वर बुद्ध लेणी.
खंडाळा तालुक्यात लयनगिरी बुद्ध लेणी शिरवळ, केसुर्डी बुद्ध लेणी,खंबाटकी घाट खांबटाके लेणी,नायगाव फाटा प्राचीन नाणेकर वसुली रांजण.,पाटण तालुक्यात वळसे तारळे बुद्ध लेणी, सडावाघोली बुद्ध लेणी,धारेश्वर दिवशी बुद्ध लेणी, तामकने बुद्ध लेणी, पाटण लेणी शिल्प,येरफळे लेणी,आढूळ लेणी, येराडवाडी लेणी,
,कराड तालुक्यात किरपे लेणी,
जखीनवाडी लेणी,कमळभैरी लेणी,आगाशिवनगर,चचेगाव लेणी, विंग लेणी,
सातारा लेणी, महाबळेश्वर राजपुरी बुद्ध लेणी अशा सातारा, पाटण,कराड, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील लेण्यांची यादी व माहिती यावेळी रोहित वाघमारे यांनी दिली.
कराड टीमच्या वतीने ६७ व्या लेणी दौऱ्यानिमित्त वहीवाटप व खीरदान करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी बौध्द युवा जागृतीचे संस्थापक आयु. कैलास कांबळे, रोहित वाघमारे,आनंदा कांबळे,संजय कांबळे, स्वन्पील जाधव,आकाश एटांबे,श्रीधर गोखले,शशिकांत दुपटे, तानाजी कांबळे,पंचशिला अमोल वाघमारे, आमोल गायकवाड, प्रा.आर. ए कांबळे,विशेष सहकार्य मंजुनाथ कांबळे व कोल्हापूरच्या भारतीय बौध्द महासभा व २२ प्रतिज्ञा अभियान पन्हाळा चे तेजस कांबळे, उत्तम जाधव, प्रदीप कांबळे, नामदेव वांद्रे, नामदेव सावंत गोठेकर, रमाकांत काकडे, अनिल कांबळे पन्हाळा पश्चिम महिला सपना माळवी,अलका वांद्रे, सुनीता कांबळे,वर्षा माळवी, लता कांबळे, मिनाक्षी सरनाईक
आणि पन्हाळा तालुक्यातील सर्व उपासक आणि उपासिका यावेळी उपस्थित होते.




