पारंपारिक पद्धतीने श्री गणेशाची मिरवणूक काढण्यावर मंडळांनी भर द्यावी
शांतता समितीची बैठक संप्पन्न

कराडमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न
पारंपारिक पद्धतीने श्री गणेशाची मिरवणूक काढण्यावर मंडळांनी भर द्यावी
अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर
कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की दि. 05.09.26 रोजी सकाळी 10 वाजता कराड येथील अर्बन बँक शताब्दी हॉलमध्ये सातारा पोलीस दलातर्फे शांतता समितीचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा , सातारा जिल्हा पोलीस प्रमुख श्री. निखिल पिंगळे , सातारा जिल्हाधिकारी श्री.संतोष पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर , उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील , प्रांत अधिकारी श्री अतुल म्हेत्रे, कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय दराडे, कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ , कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे , कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री निखिल मगदूम , कराड नगरीचे लोकप्रिय नगराध्यक्ष श्री राजेन्द्रसिंह यादव , उपनगराध्यक्ष श्री पोपटराव साळुंखे , मलकापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री तेजस सोनवणे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे भाऊ तसेच आरटीओ विभागाचे अधिकारी विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाचे अधिकारी तसेच कराड शहरासह तालुक्यातील आजी माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते व गणेश मंडळाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते ,
यावेळेस उपस्थितांना मार्गदर्शन करताना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री रंजनकुमार शर्मा म्हणाले की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणेश मंडळाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच मंडळामध्ये जे आपण वायरिंग करत आहोत ते वायरिंग चांगल्या दर्जाचे असावेत तसेच रात्रीच्या वेळेस गणेश मंडळाजवळ किमान चार कार्यकर्ते असावे जेणेकरून मुक्या प्राण्यांकडून भटक्या प्राण्यांकडून श्री गणेश मूर्तीची विटंबना होणार नाही गणेश मंडळाने महाप्रसादासाठी कोणतेही प्रकारचे अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही परंतु महाप्रसादाच्या दरम्यान स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे तसेच गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या नोटीस प्रमाणे सहकार्य करावे व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सहकार्य करावे !
यावेळेस उपस्थितांना मार्गदर्शन करताना सातारा जिल्हा पोलीस प्रमुख श्री निखिल पिंगळे म्हणाले की श्री गणेशोत्सव साजरा करताना तसेच विसर्जन मिरवणुकी दरम्यान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे तसेच डीजे म्हणजे काय डॉल्बी म्हणजे काय याबाबत सविस्तरपणे माहिती दिली तसेच गणेश मंडळांना सहकार्य करत असताना दोन बेस दोन टॉप या पार्श्वभूमी वरती स्पीकर परवाने दिले जातील व त्याबद्दलचे आवाज मर्यादा किती असावी याबद्दल प्रत्येक गणेश मंडळाला नोटीस दिले जाईल त्याचे पालन करणे बंधनकारक राहील जो कोणी याचे पालन करणार नाही त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येतील , त्यामुळे गणेश मंडळांनी गणेशोत्सवामध्ये काळजी घेणे गरजेचे आहे , तसेच जे कोणी गणेश मंडळे नियमांचे पालन करणार नाहीत यांच्यावरती गुन्हे दाखल तर होणारच परंतु गुन्हे दाखल करत असताना कोणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू नये !
यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना सातारा जिल्हा अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर म्हणाल्या की श्री गणेश मंडळांनी पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यावरती भर द्यावी , तसेच कराड शहरासह तालुक्यातील श्री गणेश मंडळे असे आहेत की पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले किंवा एखादी सूचना दिली तर त्याचे पालन ते नक्कीच करतात हा माझा गेल्या दोन वर्षांपूर्वीचा अनुभव आहे , यावे बैठकीत उपस्थित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना श्रीमती वैशाली कडूकर यांनी डीजे कोणास पाहिजे असा प्रश्न विचारला असता उपस्थितांपैकी फक्त एकाने हात वरती केला तो म्हणजे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यावरती स्पष्टीकरण देताना आनंदराव लादे म्हणाले की डीजे डॉल्बी बद्दल सर्वप्रथम कराड शहरामध्ये माझ्यावरती गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे मागच्याच ठेस पुढचा शहाणा झाला पाहिजे या उद्दिष्टाने मी हात वरती केला आहे , तदनंतर वैशाली कडूकर मॅडम म्हणाल्या की , कराड शहरामध्ये 292 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका येत असतात त्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे आपणास विनंती आहे की एक दिवस उत्साहाचा आहे परंतु तो उत्साह साजरा करत असताना वर्षभर तुम्हाला त्रास होणार नाही याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे , सर्व गणेश मंडळांनी देखील जबाबदारी घेणे गरजेचे आहे काळजी घेणे गरजेचे आहे , सर्वांनी पोलीस प्रशासनासोबत राहून प्रशासनास सहकार्य करावे
यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील म्हणाले की डीजे डॉल्बी ध्वनी प्रदूषण मुळे काय काय नुकसान होते याचे भान मंडळांनी ठेवणे गरजेचे आहे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याच्या पाठीमागचा नेमका उद्देश काय होता कोणत्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्थापना करण्यात आली हे जाणून घेणे गरजेचे आहे डीजे डॉल्बी चे धोके काय आहेत ज्येष्ठ नागरिकांना काय त्रास होतो तसेच आपणही एक ना एक दिवस जेष्ठ होणार आहोत याचे सर्वांनी भान ठेवावे तसेच गणेश मंडळांनी अनावश्यक खर्च टाळून तोच खर्च चांगल्या उपक्रमासाठी करावा, व समाजापुढे आपल्या गणेश मंडळाचा एक आदर्श निर्माण करावा !
यावेळी कराड तालुक्यातील वडगाव हवेली गावाच्या सरपंचांचा विशेष सत्कार करण्यात आला त्याचे कारण असे होते की गेले दोन वर्षे झाले वडगाव हवेली गावामध्ये डीजे डॉल्बीमुक्त सण उत्सव साजरे केले जात आहेत , डीजे डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्या पाठीमागे काय कारण आहे याबाबत आपले मनोगत व्यक्त करताना वडगाव हवेलीचे सरपंच म्हणाले की , काही दिवसा वरती येऊन टेकलेल्या गणेशोत्सवाच्या अगोदर गावातील काही ज्येष्ठ मंडळी बॅगा घेऊन जात असताना मी त्यांना विचारणा केली की तुम्ही कुठे निघाला आहात तर ते म्हणाले की आम्ही परगावी निघालो आहोत गणेशोत्सव झाल्यानंतर आपल्या गावात परत येणार कारण हा डीजे डॉल्बीचा दणदणाट आम्हाला सहन होत नाही म्हणून आम्ही गाव सोडून बाहेर निघालो आहोत , आपल्याच गावचे मंडळी डीजे डॉल्बी मुळे जर बाहेरगावी जात असतील तर आपण डीजे डॉल्बी मुक्त सण उत्सव का साजरा करू शकत नाही म्हणून संपूर्ण वडगाव हवेलीच्या गावाने मिळून डीजे डॉल्बी मुक्त सण उत्सव साजरे करण्याचा निर्णय घेतला सरपंचांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितितांमधून टाळ्यांचा कडकडाट ऐकू आला
तदनंतर उपस्थितितांमधून सूचना व्यक्त करताना कोण काय म्हणाले ते पहा 👇👇👇
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कराड शहराध्यक्ष सागर बर्गे म्हणाले की पोलिसांतर्फे राबवण्यात येणाऱ्या गणराया अवॉर्डमध्ये पोलीस प्रशासनाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे तसेच शांतता कमिटी मधील सदस्यांना कमिटी कार्ड मिळावेत व ध्वनी प्रदूषणाबाबत पोलीस प्रशासनाने डीजे चालकांना बोलावून त्यांची एक स्वतंत्रपणे मीटिंग घ्यावी तसेच कराड शहर पोलिसांतर्फे गांजा विक्रेत्यांवर करण्यात आलेली कारवाई मॉडीफाय सायलेन्सर वरती केलेली कारवाई ही कौतुकास्पद असून कराड शहराच्या नागरिकांच्या वतीने आम्ही पोलीस प्रशासनाचे आभार मानत आहोत
मलकापूर नगर परिषदेचे माजी सभापती श्री राजेंद्र यादव ( आर आबा ) म्हणाले की गणेशोत्सवाच्या अगोदर एम एस सी बी ने रस्त्यावरती लोणकरणाऱ्या वायरा स्ट्रीट लाईट्स अडथळा निर्माण करणारे झाडे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे
कराड नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री सौरभ पाटील म्हणाले की कराड शहरांमध्ये कृष्णा नदीमध्ये श्री गणेशाचे मूर्तीचे विसर्जन करण्याकरता अनेक सार्वजनिक मंडळी तसेच घरगुती श्री गणेश मूर्ती घेऊन अनेक नागरिक येत असतात यावेळेस टेंभू सासिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी पाण्याची लेवल ठेवणे गरजेचे आहे तसेच येणाऱ्या नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करण्यावर भर देणे गरजेचे आहे
नगरसेवक गणेश पवार म्हणाले की गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवान्यासाठी एक खिडकी योजना राबवावी जेणेकरून गणेश मंडळांचा वेळ वाचेल व त्रासही होणार नाही
भूषण जगताप म्हणाले की डीजे डॉल्बी नियम फक्त गणेशोत्सवा प्रति मर्यादित नको तर तो राजकीय मंडळींना देखील लागू करावा
भीमशक्ती सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे म्हणाले की शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे येणाऱ्या गणेशोत्सव काळामध्ये गणेशोत्सवा दरम्यान तसेच गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान या मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना त्रास होता कामा नये तसेच कराड शहरातील रिक्षा चालकांना शिस्त लागणे देखील गरजेचे आहे
शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष अनिल घराळ ( बापू ) म्हणाले की लेझर लाइट्स मुळे नागरिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होतो त्यामुळे लेझर लाइट्स वापरण्यावरती बंदी घालावी तसेच हॉकर्स झोनसाठी कराड नगर परिषदेने वाहतूक नियंत्रण शाखेला आठ जागा सुचवल्या होत्या त्यातील पाच जागा वाहतूक नियंत्रण शाखेने नाकारल्या याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे कारण हॉकर्स धारकांचे पुनर्वसन झाले तर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होईल
कराड नगर परिषदेचे भाजपा नगरसेवक तसेच गटनेते श्री विजय वाटेगावकर म्हणाले की डीजे डॉल्बी संदर्भातील नियम फक्त गणेशोत्सवापुरते मर्यादित ठेवू नका तर त्याचे नियमावली वर्षभर राबवा मग ते राजकीय मंडळी असो किंवा अन्य कोणी फक्त गणेशोत्सवा पुरते डीजे डॉल्बीची मर्यादा लागू केल्यास कार्यकर्त्यांच्या भावना दुखावले जातील तसेच अनंत चतुर्थी दिवशी चावडी चौकामध्ये उभा करण्यात येणारा स्टेज हा लहान करावा गणेश मंडळांचे स्वागत करण्याकरिता जो आपण नगर परिषदेमार्फत स्टेज उभारणी करता तो यंदा लहान करावा म्हणजे त्या ठिकाणी जागेची मर्यादा तसेच गर्दी होणार नाही
भाजपा सदस्य तथा माजी नगरसेविका स्मिता हुलवान म्हणाले की पोलीस प्रशासनाने रात्रीच्या बारा वाजता साजरे होणारे वाढदिवसा वरती कारवाया करणे गरजेचे आहे कारण अचानकपणे रात्रीच्या बारा वाजता फटाक्याचा आवाज येतो आणि नागरिकांना त्याचा प्रचंड प्रमाणात त्रास होतो याचा बंदोबस्त पोलीस प्रशासनाने करणे गरजेचे आहे
उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले
अशा पद्धतीने आज कराड शहरामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र श्री रंजन कुमार शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समितीची बैठक अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली




