E-Paper

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विजयनगर येथे भव्य योग शिबीराचे आयोजन — माजी आमदार श्री. आनंदराव पाटील यांची माहिती 

आंतरराष्ट्रीय योग दिन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विजयनगर येथे भव्य योग शिबीराचे आयोजन — माजी आमदार श्री. आनंदराव पाटील यांची माहिती 

कराड प्रतिनिधी — या बाबत ची अधिक माहिती अशी की,२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन असून या योग दिनानिमित्त कराड तालुक्यातील विजयनगर येथील पार्वती लान येथे रविवार दिनांक २१ जून रोजी सकाळी ७.३०. वाजता भव्य योग शिबीराचे आयोजन केले असल्याची माहिती माजी आमदार श्री. आनंदराव पाटील यांनी दिली.

यावेळी श्री. आनंदराव पाटील यांनी माहिती देताना सांगितले की,योग ही भारताची प्राचीन आणि महान परंपरा असून आज संपूर्ण जगाने तिचा स्विकार आहे. भारताचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्त्व जागतिक पातळीवर पोहचवून भारताच्या संस्कृतीचा गौरव वाढवलेला आहे. योग हा केवळ व्यायाम नसून शरीर,मन, आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनपद्धती असल्याने प्रत्येकाने आपापल्या दैनंदिन जीवनात योगाचा अंगिकार करावा करावा. 

या भव्य योग शिबीरासाठी योग प्रशिक्षण देणारे व स्वतः फिटनेस स्टुडिओ चे संचालक श्री. शंतनु कालेकर सर हे या शिबिराचे मुख्य आकर्षण असणार आहेत. तरी या भव्य शिबिरासाठी विजयनगर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही आनंदराव पाटील यांनी केले आहे.

या योग शिबीराला कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय दराडे, उद्योजक श्री. आर. टी. स्वामी, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक वसंतराव शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!