माय मराठी टीव्हीच्या वृत्ताची नगरपालिकेकडून दखल
विनापरवाना फ्लेक्स बोर्ड बद्दल केले होते वृत्त प्रसिद्ध

माय मराठी टीव्हीच्या वृत्ताची नगरपालिकेकडून दखल
विनापरवाना फ्लेक्स बोर्ड बद्दल केले होते वृत्त प्रसिद्ध
वृत्त प्रसिद्ध होताच परवाना घेण्यासाठी काही जणांची पालिकेत धाव तर ज्यांनी परवाने घेतले नव्हते त्यांचे फ्लेक्सबोर्ड पालिकेकडून जप्त
कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की आज दुपारी माय मराठी टीव्ही ने कराड शहरामध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या विनापरवाना फ्लेक्सबोर्ड बद्दल वृत्त प्रसिद्ध केले होते
यानंतर माय मराठी टीव्हीच्या प्रतिनिधीने नगराध्यक्ष श्री राजेंद्रसिंह यादव व मुख्याधिकारी श्री प्रशांत व्हटकर यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली तदनंतर ताबडतोब नगराध्यक्ष श्री राजेंद्रसिंह यादव व मुख्याधिकारी श्री प्रशांत व्हटकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करत शहरातील विनापरवाना लावण्यात आलेले फ्लेक्सबोर्ड हटवण्याबाबत सूचना केल्या
, वृत्त प्रसिद्ध होताच काही जणांनी पालिकेत धाव घेत फ्लेक्स बोर्ड लावण्या बाबतचा परवाना घेतला तर ज्यांनी परवाना घेतला नाही त्यांचे शहरात ठीक ठिकाणी लावण्यात आलेले फ्लेक्स बोर्ड पालिकेने जप्त केले ,
एकंदरीतच आज माय मराठी टीव्हीच्या वृत्ताची दखल कराड नगरीचे नगराध्यक्ष श्री राजेंद्रसिंह यादव व मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी घेतली व शहरातील विनापरवाना फ्लेक्स जप्त करण्यात आले
परंतु ज्यांनी ज्यांनी फ्लेक्स बोर्ड लावण्या संदर्भात परवाने घेतले आहेत त्यांनी ज्या ज्या ठिकाणचा उल्लेख केलेला आहे ते ठिकाण सोडून इतर ठिकाणी पालिकेच्या डोळ्यात धूळफेक करून लावलेल्या फ्लेक्सबोर्ड वरती पालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे लक्ष राहणे गरजेचे आहे ,
तसेच इथून पुढील काळात कराड शहरांमध्ये पालिकेने निश्चित केलेल्या जागीच परवाना घेऊन फ्लेक्सबोर्ड लावण्यात येतील याची काळजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे तसेच विनापरवाना लावण्यात आलेले फ्लेक्स बोर्ड ताबडतोब जप्त करण्यात यावेत व कारवाई मध्ये सातत्य ठेवण्यात यावे अशी मागणी कराड शहरातील सुज्ञ नागरिकांमधून होऊ लागली आहे !

व्हिडीओ पाहण्यासाठी 👇👇👇 येथे क्लिक करा




