E-Paper

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु  / सावधानतेचा इशारा

दि. 31 जुलै 2026 रोजी रात्री 10 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे २ फुटावरून ३ फुटापर्यंत उघडून १६,५३५ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार 

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु  / सावधानतेचा इशारा

दि. 31 जुलै 2026 रोजी रात्री 10 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे २ फुटावरून ३ फुटापर्यंत उघडून १६,५३५ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार 

कोयना नगर प्रतिनिधी  :- दि. 31.07.26 याबाबत कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सूचित केले आहे की कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. 

कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी  आज दि. ३१ जुलै २०२६ रोजी रात्री १०:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे २ फुटावरून ३ फुटापर्यंत उघडून १६,५३५ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.

कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे १०५० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण १७,५८५ क्युसेक विसर्ग सुरू होईल.

तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येणार्‍या येव्यानुसार सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो.

धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद व उचित खबरदारी घ्यावी असे कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सूचित केले आहे !

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!